शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मनोमिलनाचा लागणार कस!

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

सातारा तालुक्यात : दोन गटांतील अस्वस्थ कार्यकर्ते इरिला पेटलेत

सागर गुजर - सातारा -ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने सातारा तालुक्यातील स्थानिक कार्यकर्त्यांचा सत्तासंघर्ष उफाळून आला आहे. खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील मनोमिलनाच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामपंचायतींत दोन गटांची सत्ता आहे. मात्र, स्थानिक पातळीवरील सत्ता संघर्षामुळे कार्यकर्ते भलतेच इरिला पेटले आहेत. तालुक्यातल्या २८ गावांत मनोमिलनाचा कस लागणार, हे आता स्पष्टच झाले आहे. तालुक्यातील अलवडी, निसराळे, सायळी, वेचले, अंबवडे खुर्द, भोंदवडे, वावरदरे, कामथी, वळसे, यवतेश्वर, विजयनगर, आष्टे तर्फ परळी, परमाळे या तेरा ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात त्या-त्या भागातील स्थानिक नेतेमंडळींना यश आले असले तरी इतर ठिकाणी संघर्ष अटळ ठरणार आहे. खेड, जांभळेवाडी, सासपडे, फडतरवाडी, फत्यापूर, गजवडी, सोनापूर, दरे बुद्रुक, पिलाणी, निगडी तर्फ सातारा, संमगमाहुली, पांगारे, सोनगाव स. निंब, गवडी, कण्हेर, संभाजीनगर, शेळकेवाडी, आटाळी , कारंडवाडी, वर्ये, नागेवाडी, वेळे, बोरगाव, विलासपूर, शेंद्रे, डोळेगाव या गावांमध्ये संघर्ष अटळ असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार शशिकांत शिंदे यांचे नेतृत्व मानणारा वर्ग या गावांमध्ये जास्त आहे. साहजिकच या गावांमध्ये राष्ट्रवादी पक्षातील गटातटाचे राजकारण पेटल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही गटांचे अस्वस्थ कार्यकर्ते सत्तासंघर्षात गुंतले आहेत. दोन्ही राजेंचा पाठिंबा मिळविण्याचा खटाटोप अनेक ठिकाणी सुरूअसल्याचे पाहायला मिळत आहे. खेड ग्रामपंचायतीवर आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटाची सत्ता अबाधित राखण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी फिल्डिंग लावलेली आहे. तर येथीलच दुसऱ्या गटाने खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थन मिळविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी मनोमिलनाच्या माध्यमातून सत्तास्थापन केली गेली असल्याने स्थानिक राजकारणात विशेष लक्ष न घालण्याचे धोरण खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ठरविल्याचे चित्र आहे. १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करण्यात पहिल्या टप्प्यामध्ये यश आले आहे. मात्र २८ गावांत संघर्ष चांगलाच पेटणार आहे. स्थानिक पातळीवरील इर्ष्याचया निवडणुकीसाठी कारणीभूत असल्याचे चित्र तालुक्यात सार्वत्रिक ठिकाणी पाहायला मिळते. या इर्ष्येमुळे मनोमिलनाचा भलताच कस लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. साहजिकच निवडून आल्यानंतर कुठल्या वाड्यावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असेल, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. नेते ‘सेम’ कार्यकर्त्यांमध्ये ‘गेम’तालुक्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व मानणाऱ्या जवळपास सर्वच ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे प्रत्येक गावात एकमेकांविरोधातील कार्यकर्त्यांचे नेते ‘सेम’ आहेत; पण कार्यकर्त्यांमध्येच पॉलिटिकल ‘गेम’ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.