शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
2
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
3
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
4
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
5
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
6
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
7
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
8
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
9
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
10
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
11
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
12
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
13
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
14
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
15
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा
16
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
17
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
18
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
19
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
20
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे

सेवापूर्ती अन् सेवाभावींच्या सन्मानाचा संगम अलौकिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:57 IST

पाचवड : ‘ज्यांनी आयुष्यभर ज्ञानदान करून सेवापूर्ती केली. जे तरुण सेवाभावी वृत्तीने कार्यरत आहेत त्यांचा एकत्र सन्मान करून साधलेला ...

पाचवड : ‘ज्यांनी आयुष्यभर ज्ञानदान करून सेवापूर्ती केली. जे तरुण सेवाभावी वृत्तीने कार्यरत आहेत त्यांचा एकत्र सन्मान करून साधलेला संगम अलौकिक आहे,’ असे गौरवोद्गार शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख व शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठल माने यांनी काढले.

भुईंज येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात सेवापूर्ती करणाऱ्या पाचजणांचा गौरव तसेच श्रीमंत बाबासाहेब जाधवराव यांच्या स्मृतिदिनानिमित्त वि. रा. तथा बाबासाहेब जाधवराव प्रतिष्ठानतर्फे शिववंदनेश्वर प्रतिष्ठानला पुरस्कार वितरण अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयतचे सर्वसाधारण मंडळाचे सदस्य भैयासाहेब जाधवराव होते.

माने म्हणाले, ‘बाबासाहेब जाधवराव यांनी समाजाच्या प्रत्येक घटकासाठी योगदान देत अनेक माणसे, घरे उभी केली. त्यांनी घेतलेल्या परिश्रमाची फळे म्हणजे हे विद्यालय संपूर्ण रयत परिवारात ग्रामीण भागात प्रथम क्रमांकावर आहे. शिववंदनेश्वर प्रतिष्ठानचे इतिहास जपणुकीचे काम कौतुकास्पद व भावी पिढीसाठी प्रेरणादायी आहे. भैयासाहेब जाधवराव यांनी आजपर्यंतच्या कामकाजाचा आढावा घेऊन पुढील योजनांची माहिती दिली.’

यावेळी निवृत्त उपमुख्याध्यापक पंडितराव यादव, भरती अहिरे, कुसुम जाधव, भारती खुंटाळे, राजाराम माने यांना गौरविण्यात आले. शिववंदनेश्वर प्रतिष्ठानला सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. दीपक पवार यांनी मानपत्राचे लेखन केले. स्कूल कमिटीचे सदस्य नारायण शिंदे, उत्तमराव भोसले, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जगन्नाथ दगडे, सोसायटीचे उपाध्यक्ष रामदास जाधव, प्रेस क्लबचे अध्यक्ष राहुल तांबोळी, कृष्णात घाडगे उपस्थित होते. जयवंत पिसाळ यांनी स्वागत केले. प्राचार्या सुमन कदम यांनी प्रास्ताविक केले. स्नेहल सकुंडे, संगीता जाधव यांनी सूत्रसंचालन केले. तात्यासाहेब लावंड यांनी आभार मानले.

फोटो

२२महेंद्र गायकवाड

भुईंज येथे शिवनंदनेश्वर प्रतिष्ठानला सेवा गौरव पुरस्कार भैयासाहेब जाधवराव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी विठ्ठल माने, पंडितराव यादव उपस्थित होते. (छाया : महेंद्र गायकवाड)