शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दोन भाऊंमध्ये नौटंकी संघर्ष, इस्लामपुरातील सभासदांच्यात संभ्रम

By admin | Updated: June 17, 2015 00:43 IST

कृष्णाच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. त्यांच्या या नौटंकी संघर्षाचा कारखान्याच्या काय परिणाम होतो, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

अशोक पाटील - इस्लामपूर -इस्लामपूर पालिकेच्या राजकारणात पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील आणि माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. चिमणभाऊ डांगे एकदिलाने कार्यरत आहेत. मात्र कृष्णा सह. साखर कारखान्याच्या निवडणुकीत विजयभाऊंचे चुलत बंधू संजय पाटील सहकार पॅनेलचे उमेदवार आहेत, तर अ‍ॅड. चिमणभाऊ गटाचे विद्यमान नगरसेवक पै. चंद्रकांत पाटील हे रयत पॅनेलमधून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे दोन भाऊंचा नौटंकी संघर्ष सुरू झाला असून, सभासद मात्र संभ्रमात पडले आहेत.इस्लामपूर पालिकेच्या राजकारणात आमदार जयंत पाटील आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष कार्यरत आहे. पालिकेत पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, अ‍ॅड. चिमणभाऊ डांगे आणि एन. ए. गु्रपचे खंडेराव जाधव असे तीन गट कार्यरत असून, या तिघांनाही न मानणारे काही नगरसेवक आहेत. विजयभाऊ पाटील हे सहकार पॅनेलचा प्रचार करत आहेत, तर अण्णासाहेब डांगे आणि त्यांचे चिरंजीव अ‍ॅड. चिमण डांगे त्यांच्याच गटाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या पाठीशी ठाम आहेत. त्यामुळे या दोन भाऊंमध्ये तात्पुरत्या स्वरुपाचा संघर्ष निर्माण झाला आहे, तर या तिघांनाही न मानणारे नगरसेवक संस्थापक पॅनेलच्या अविनाश मोहिते यांच्या पाठीशी असल्याची चर्चा आहे.भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील यांचा पूर्वी रयत पॅनेलला पाठिंबा होता. परंतु रयतने डांगे गटाच्या चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. अ‍ॅड. चिमण डांगे, विक्रमभाऊ पाटील आणि बाबासाहेब सूर्यवंशी यांच्यामध्ये मोठी दरी आहे. त्यामुळे विक्रम पाटील गटाची भूमिका काय राहणार, यावरही प्रश्नचिन्ह आहे.कृष्णाच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. त्यांच्या या नौटंकी संघर्षाचा कारखान्याच्या काय परिणाम होतो, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.मी आकसापोटी पत्रक काढलेले नाही. सभासद, कामगारांचे हित जपण्यासाठी माझा विरोध होता. गत निवडणुकीत माझ्याच ताकदीवर संस्थापक पॅनेल निवडून आले आहे. यावेळची उमेदवारी देण्यासाठी ते माझ्या दारात आले होते. कृष्णाच्या हितासाठी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.- महादेवराव पाटील, संचालक य. मो. कृष्णा सह. साखर कारखाना.