शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

भक्तांचा निर्धार पक्का; यंदाही डॉल्बीला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 23:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष, पारंपरिक वाद्यांचे सूर अन् रंगीबेरंगी फुलांचा वर्षाव, अशा भक्तीमय वातावरणात दहा दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. जिल्ह्यातील गणेश मंडळांनी डॉल्बीमुक्त विसर्जनाचा अध्याय गेल्यावर्षीप्रमाणे याहीवर्षी कायम ठेवला. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना अनेकांचा कंठ दाटून आला.सातारा शहरात सोमवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष, पारंपरिक वाद्यांचे सूर अन् रंगीबेरंगी फुलांचा वर्षाव, अशा भक्तीमय वातावरणात दहा दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. जिल्ह्यातील गणेश मंडळांनी डॉल्बीमुक्त विसर्जनाचा अध्याय गेल्यावर्षीप्रमाणे याहीवर्षी कायम ठेवला. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना अनेकांचा कंठ दाटून आला.सातारा शहरात सोमवारी दहा दिवसांच्या घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन मिरवणुकीमुळे ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. त्यामुळे विसर्जन मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली नाही. भाविक व नागरिकांच्या सुरक्षेसाठी कडेकोट पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.विसर्जन मिरवणुकीस सोमवारी सकाळपासूनच प्रारंभ झाला. राजवाडा येथून मिरवणुका मार्गस्थ झाल्या. मोती चौक, देवी चौक, कमानी हौद, शेटे चौक, पाचशे एक पाटी, शनिवार चौक मार्गे मोती चौकातून पुढे बसाप्पा पेठ चौकपर्यंत मिरवणुका काढण्यात आल्या. दहा दिवसांचे बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी तातडीने मंडप हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.सायंकाळी पाचनंतर मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी मुख्य चौकांमध्ये मिरवणूक पाहायला गर्दी केली होती. प्रतापसिंह शेती फार्म हाऊसच्या जागेत पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम तळ्यात क्रेनच्या साह्याने शिस्तबद्ध पद्धतीने गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. या व्यतिरिक्त हुतात्मा स्मारक, कोडोली, दगडी शाळा परिसरातील कृत्रिम तळे व पालिकेच्या जलतरण तलावातही मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.सातारा शहरासह जिल्ह्यातील अनेक गणेशोत्सव मंडळांना याहीवर्षी डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणुकीचा अध्याय कायम ठेवल्याने कोठेही डॉल्बी दणाणली नाही. मात्र, पारंपरिक वाद्यांच्या निनादाने ऐतिहासिक शहर उल्हासित झाले. मंगळवारी (दि. ५) साताºयासह जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक व घरगुती गणपती मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. यासाठी पोलिस व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.प्रतापसिंह शेती फार्म हाऊसच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जनाचे व्हिडीओ शूटिंगही यावेळी करण्यात येणार आहे. तब्बल शंभर टन वजनी के्रनच्या साह्याने बाप्पांच्या मूर्र्तींचे विसर्जन केले जात आहे. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.पोलिसांकडूनफटाके जप्तविसर्जन मिरवणुकीत फटाके वाजविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. सोमवारी काही गणेश मंडळांचे कार्यकर्तेे फटाके वाजविण्याच्या तयारीत होते. तत्पूर्वीच पोलिस दलाच्या वतीने सर्व फटाके जप्त करण्यात आले.महावितरणच्यापथकाचा पहारागणेश विसर्जन मिरवणुकीवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी महावितरण विभागाचे पथक मिरवणूक मार्गावर सज्ज होते. वीज पुरवठा खंडित झाल्यास अथवा कोणता अडथळा आल्यास या पथकाकडून तातडीने दुरुस्ती केली.पर्यायी मार्गाने वळविली वाहतूकविसर्जन मिरवणुका सोमवारी सायंकाळी सुरू झाल्यानंतर पोवई नाक्याकडून येणारी वाहने नगरपालिकेच्या जुन्या प्रवेशद्वाराकडून पुढे बोगद्याकडे पाठविली जात होती. कमानी हौदापासून मोती चौकापर्यंत केवळ विसर्जन मिरवणूक सुरू होती. मोती चौकात मिरवणुकीमुळे कोंडी होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात होती. मोती चौकात वॉच टॉवरवर उभे राहून पोलिस मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते.