शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

कासच्या साकव पुलाचे काँक्रीट ढासळले

By admin | Updated: April 29, 2017 13:04 IST

पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

लोकमत आॅनलाईन सातारा , दि. २९ : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या सांडव्यासमोर असणारा साकव पूल मोडकळीस आला असून धोकादायक स्थितीत उभा आहे. तसेच या पुलाच्या खालच्या बाजुने मोठ्या प्रमाणावर बांधकामाचे काँक्रीट पडलले असून हा पूल केव्हाही कोसळून एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.जिल्हयातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून कासची ओळख आहे. पावसाळयात चोहो बाजूला दाट हिरवीगार गर्द झाडी, ठिकठिकाणी कोसळत असणारे छोटे-मोठे धबधबे , पठारावरील विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुले पाहण्यासाठी जिल्हा, तसेच राज्या राज्यातून पर्यटकांची आपसुक पावले कास पठाराकडे वळत असतात.कास पठार पाहण्यासाठी आलेले बहुसंख्य पर्यटक नेहमीच कास तलाव पाहण्यासाठी गर्दी करतात. कित्येक पर्यटक तलावाच्या दक्षिणेस असणाऱ्या जुन्या साकव पुलाकडे धाव घेतात. मात्र सध्या या पुलाचे काँक्रीट ढासळल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा पूल दुरूस्त होत नाही तोपर्यंत सध्या पर्यटकांसाठी बंद ठेवावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. (प्रतिनिधी)