शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

माजी सैनिकाच्या पत्नीची खासगी सावकारीविरोधात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:42 IST

फलटण : खासगी सावकाराकडून अडचणीच्या काळात २ लाख १० हजार रुपये घेतले होते. त्याबदल्यात सावकाराकडून ३२ लाखांची मागणी ...

फलटण : खासगी सावकाराकडून अडचणीच्या काळात २ लाख १० हजार रुपये घेतले होते. त्याबदल्यात सावकाराकडून ३२ लाखांची मागणी करण्यात आली. तसेच शेतजमीन परस्पर नावावरही करुन घेतली. त्यानंतर मारहाण करत असल्याचा आरोप निंबळक, ता. फलटण येथील माजी सैनिकाची पत्नी प्रभावती बाबूराव ढमाळ यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी खासगी सावकारीविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत दिलेल्या तक्रार अर्जात प्रभावती ढमाळ यांनी म्हटले आहे की, त्यांना सोरायसीस हा त्वचेचा आजार असून औषधोपचारासाठी त्यांनी नवनाथ सदाशिव राणे या खासगी सावकाराकडून ४ फेब्रुवारी २०१४ रोजी २५ हजार रुपये त्यानंतर सून नीलम ढमाळ यांना पॅरालिसिसचा अ‍ॅटॅक आल्याने औषधोपचारासाठी २१ ऑगस्ट २०१४ रोजी ५० हजार आणि २ मार्च २०१५ रोजी रानातल्या पाइपलाइनच्या कामासाठी १ लाख ३५ हजार असे एकूण २ लाख १० हजार दहा टक्के व्याजाने घेतले होते. संबंधित सावकाराने ‘तुमच्याकडून ३२ लाख रुपये येणे आहे,’ असे सांगून साडेतीन एकर जमीन माझ्याकडे मुदत खरेदीने द्या, असे सांगून मुदत खरेदीसाठी नेले. परंतु प्रत्यक्षात शब्दात फसवणूक करून संबंधित जमीन कायम खूश खरेदीने त्याचे वडील सदाशिव अर्जुन राणे यांच्या नावावर करून घेतली. ही बाब लक्षात आल्यानंतर ढमाळ यांनी हरकत घेतली असता ‘तुम्ही पैसे दिल्यावर जमीन परत फिरवून देतो,’ असे नवनाथ राणे याने सांगितले.

ढमाळ व त्यांचे कुटुंबीय वारंवार नवनाथ राणे याला रक्कम देण्यास गेल्यावर त्याने ३२ लाख रुपये परत दिल्याशिवाय जमीन परत देणार नाही, असे सांगितले. त्यानंतर ढमाळ यांनी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितल्यावर राणे याने तीन एकरापैकी दीड एकर जमीन ढमाळ यांच्या सुनेच्या नीलम विनायक ढमाळ यांच्या नावावर फिरवून दिली. त्यानंतर पैशासाठी नवनाथ राणे वारंवार मारहाण करून छळ करत आहे.