शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

‘मोदी सरकार’च्या नावावर कंपनीचा भूलभुलैया !

By admin | Updated: February 27, 2015 00:19 IST

उत्तर कोरेगावात फसव्या योजना : मार्केटिंगच्या नावाखाली अनेकांना लाखोंचा गंडा; ग्रामस्थ हतबल

पिंपोडे बुद्रुक : ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता मग ती अशिक्षित असो अथवा सुशिक्षित. कोणत्या ना कोणत्या आमिषाला बळी पडत असते. सध्या उत्तर कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुकसह परिसरात पुण्यातील एका कंपनीच्या नावाने गृहोपयोगी वस्तूंची विक्री करून जनतेला दिवसा ढवळ्या फसविले जात आहे. गेल्या पंधरा दिवसांत परिसरातून हजारो रुपये उकळून टोळी पसार झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, आपले हसू होईल, या भीतीने कुणीही तक्रार करीत नाही.याबाबतचे वृत्त असे की, पुणे येथील एका फर्मच्या नावाने पावती पुस्तके छापून काही तरुण, तरुणी ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात दुपारच्यावेळी फिरून वस्तूंची विक्री करीत आहेत. त्यामध्ये प्रेशर कुकर, तवा, कढई, स्टील पातेली, चांदीचे पॉलिश असलेले ग्लास, वीज बचतीसाठी पॉवर सेव्हर मशीन अशा प्रकारच्या वस्तूंचा समावेश असून, या वस्तूंची एकूण किमती पैकी काही रक्कम अ‍ॅडव्हान्स घेऊन त्या वस्तू तुम्ही सांगितलेल्या दिवशी तुम्हाला घरपोच करण्याचे आश्वासन दिले गेले. याशिवाय वस्तू खरेदी केल्यावर तुम्हाला एका कंपनीचा ३२ इंची टीव्ही भेट मिळणार आहे, त्यासाठी फक्त एक हजार रुपये भाडेखर्च द्यावा लागेल, असे सांगितले जात आहे. याचबरोबर जर आपण आणखी तीन सभासद ग्राहक दिले तर आपणास किमान दहा हजार रुपये किमतीची वस्तू मोफत दिली जाईल, त्यासाठी तुमच्या आवडीच्या वस्तू तुम्ही सुचवा असे प्रलोभन दाखविले जात आहे.लहान मुलांच्या नावाने खरेदी करा आम्ही पुढील दहा वर्षे प्रतिवर्षी एक भेटवस्तू त्या मुलास देणार असल्याचे फसवे आश्वासन दिले जात असून, यासाठी जनता मुख्यत्वे महिला या गोष्टींना लेगचच फसत असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)- राज्य सरकार अथवा केंद्र सरकारने अशी कोणतीही योजना आणलेली नाही, त्यामुळे जनतेने या गोष्टींना बळी पडू नये तसेच यापुढील काळात जर कोणी अशा वस्तू विकताना नजरेस आला तर स्थानिक पोलिसांशी अथवा आमच्याशी संपर्क साधावा- दीपक पिसाळ, तालुकाध्यक्ष, भाजपा कोरेगावसंबंधित कंपनीचा पत्ताही फसवा...पिंपोडे येथील काही ग्रामस्थांना संबंधितांच्या वतीने देण्यात आलेल्या पावतीवरील पत्ता फसवा असून, या पत्त्यावर पिंपोडेतील एका युवकाने चौकशी केली असता अशी कोणतीही कंपनी अस्तित्वात नसल्याचे आढळून आले आहे. पावतीवर छापण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकापैकी दोन मोबाईल क्रमांक अस्तित्वात नसल्याचे अथवा संपर्कहीन असल्याचे काही ग्रामस्थांना दिसून आले. आहे तसेच संबंधित पावतीवर देण्यात आलेला एक क्रमांक हा सोलापूर येथील युवकाचा असून संबंधित युवक एका महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे. यावरूनच या योजनेचे सत्य समोर आले आहे. म्हणे, मोदी सरकारची योजनासर्वसामान्य जनतेला या वस्तू कमीत कमी किमतीत उपलब्ध व्हाव्यात, तसेच त्याचा वापर करता यावा, या देऊन मोदी सरकारने ही योजना सुरू केली असून, आमच्या कंपनीला या वस्तू विकण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचे विक्री प्रतिनिधी ग्राहकाना ठासून सांगत आहेत. त्यामुळे ग्राहकांचा पटकन् विश्वासही बसत आहे.सुशिक्षित तरुण अन् तरुणी मार्केटिंग करणारे प्रतिनिधी उच्चशिक्षित आहेत. त्यांचे उच्च दर्जाचे राहणीमान व बोलण्यातील माधुर्यामुळे ग्राहक त्यांच्या पटकन जाळ्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. दुपारच्या वेळी वयोवृद्ध व महिला घरी असल्यामुळे त्यांना फसविणे अधिक सोपे जात आहे.