शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

कराड पालिका सभेत सफाई कामगारांच्या घरावरून गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:25 IST

कराड : येथील नगरपालिका मालकीच्या पार्ले (ता. कराड) येथील जागेत सफाई कर्मचाऱ्यांना जागा व घरे बांधून देण्याच्या विषयावरून पालिकेच्या ...

कराड :

येथील नगरपालिका मालकीच्या पार्ले (ता. कराड) येथील जागेत सफाई कर्मचाऱ्यांना जागा व घरे बांधून देण्याच्या विषयावरून पालिकेच्या विशेष सभेत चांगलाच गदारोळ झाला. दरम्यान, सफाई कर्मचाऱ्यांना जागा व घरे देण्याच्या विषयासह प्रसिद्ध केलेल्या अजेंड्यातील १० विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. तसेच यापुढील पालिकेच्या सभा ऑनलाइनऐवजी ऑफलाइन घेण्यात याव्यात, अशी मागणी सर्व नगरसेवकांनी केली. त्याचबरोबर पालिकेची सर्वसाधारण सभा का बोलावली नाही? असा सवाल करत नगरसेवकांनी चांगलाच वादही घातल्याने ही सभा काहीशा गदारोळात पार पडली.

नगरपालिकेची विशेष सभा गुरुवारी ८ रोजी ऑनलाईन पद्धतीने पार पडली. सभेला नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, गटनेते सौरभ पाटील, गटनेते राजेंद्रसिंह यादव, हणमंतराव पवार, विनायक पावसकर, विजय वाटेगावकर, फारूक पटवेकर, स्मिता हुलवान, अंजली कुंभार, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सदर विशेष सभेसाठी एकूण १० विषयांचा अजेंडा प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यामध्ये आगामी नगरपालिका निवडणुकीकरिता आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी, तसेच लेखाशीर्षावरील निवडणूक खर्च या तरतुदीमधून खर्च करण्यास आर्थिक व प्रशासकीय मान्यता देणे. पालिकेच्या कायम आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार त्यांचे वेतन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा कराड येथे पाठविणे व बँकेकडून ज्या कर्मचाऱ्यांनी कर्ज घेतले असेल, त्यांचे कर्जाचे हप्ते त्यांच्या वेतन बिलातून कपात करुन त्याचा धनादेश बॅंकेकडे पाठविण्याबाबत मंजुरी देणे. उपविभागीय अधिकारी, कराड यांनी पालिकेच्या वर्ग ३ व वर्ग ४ मधील स्थायी रिक्त पदे, पदोन्नतीने भरण्याबाबत व ज्या कर्मचाऱ्यांची सेवा सलग १२ व २४ वर्षे पूर्ण झाली आहे, अशा कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे. पालिकेतील कर्मचारी सेवेत असताना मृत्यू पावल्याने त्यांच्या वारसास अनुकंपा तत्त्वानुसार नोकरी मिळण्याबाबत केलेला अर्ज व त्यावर आलेला कार्यालयीन अहवाल यांचा विचार करणे, कराड नगरपालिका कर्मचारी संघटना, कराड यांच्या अर्जानुसार कर्मचाऱ्यांना प्रतिमहाचे वेतन बिलातून देण्यात येणारा मेडिकल भत्ता बंद करुन शासनाच्या नियमानुसार वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती (मेडिक्लेम) लागू करण्याबाबत केलेली मागणी, तसेच कर्मचाऱ्यांना विमा कवच देण्याबाबत आलेल्या कार्यालयीन अहवालाचा विचार करणे, कर्मचारी व संवर्गातील कर्मचाऱ्यांना दीपावली सणासाठी सानुग्रह अनुदान मिळण्याबाबत कार्यालयीन अहवालाचा विचार करणे, संतशिरोमणी गोरोबा काका समाज विकास संस्था, कराड यांना मूर्ती बनविण्याकामी गतवर्षी दिलेली श्री हॉस्पिटलसमोरील जागा परत घेऊन जुनी नाना-नानी पार्क जवळील जागा पुन्हा तयार करणे, अशा ९ विषयांसह पार्ले येथील पालिकेच्या मालकीच्या कचरा डेपोसाठी असलेल्या जागेचा उद्देश बदलून पालिकेच्या फक्त शहर सफाई कर्मचाऱ्यांना जागा व त्यावर आवास योजनेअंतर्गत घरे बांधून मिळण्याबाबतच्या अहवालाचा विचार करुन निर्णय घेण्यात आला. अशा १० विषयांना सर्वांनी एकमताने मंजुरी दिली. मात्र, पार्ले येथील जागेवरून चांगलाच गदारोळ झाला.

सौरभ पाटील म्हणाले, नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना घरे मिळावीत. परंतु, परिपत्रकामध्ये घरांसाठी शासन पैसे देणार नाही. तेव्हा, घरे कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार त्यांची यादी तयार करावी. त्यांची फसवणूक केली जाऊ नये.

राजेंद्रसिंह यादव म्हणाले, पार्ले येथील जागेवर अतिक्रमण केलेले आहे. ते अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. आपली जागा बंदिस्त करावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. तसेच सुरुवातीलाच नगरसेवकांनी विशेष सभा का बोलावली? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या वेळी जनरल सभेची मागणी नगरसेवकांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याकडे केली. या प्रश्नावरून चांगलाच गदारोळ झाला.