शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कुमुदाविरोधात तक्रार दाखल करण्याचे आयुक्तांचे आदेश

By admin | Updated: September 16, 2016 23:46 IST

शेतकऱ्यांच्या मागणीला यश : थकित ऊस बिलप्रकरणी शासनाची कार्यवाही

कऱ्हाड : कुमुदा शुगर अ‍ॅन्ड अ‍ॅग्रो प्रोडक्ट बेळगाव यांच्याकडील गळीत हंगाम २०१४-१५ मधील थकित एफआरपीची ९ कोटी ९५ लाख रुपये रक्कम वसुली कामी ऊसदराचे विनियमन अधिनियम २०१३ मधील कलम ७ चे तरतुदी अन्वये कुमुदा शुगर यांच्याविरुद्ध सक्षम न्यायालयामध्ये प्रादेशिक सह संचालक (साखर) पुणे यांना तक्रार दाखल करण्याचे आदेश साखर आयुक्त बिपीन शर्मा यांनी दिले आहेत. साखर आयुक्तांच्या या निणर्यामुळे गेली दीड वर्ष थकित ऊस बिलाबाबत कार्यवाही होऊन रक्कम मिळावी, यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागणीला यश आले आहे.कुमुदा शुगर अ‍ॅन्ड अ‍ॅग्रो प्रोडक्ट बेळगाव (कर्नाटक) यांनी रयत सहकारी साखर कारखाना शेवाळेवाडी (म्हासोली) हा कारखाना २०१३-१४ पासून शासनाच्या परवानगीने भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला होता. या हंगामात गाळपास आलेल्या उसाचे ऊसबिल एफआरपीप्रमाणे अदा केले होते. २०१४-१५ गळीत हंगामात त्यांनी १ लाख ८४ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले. या हंगामाची एफआरपी २ हजार ३५ रुपये प्रतिटन इतकी होती.कुमुदा शुगरने पहिल्या पंधरवड्याचे ऊसबिल नियमाप्रमाणे दिले होते. मात्र दुसऱ्या पंधरवड्यापासून गाळपास आलेल्या उसाचे बिल थकल्याने रयत सहकारी साखर कारखाना व शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार प्रादेशिक सह संचालक पुणे यांनी साखर आयुक्तांकडे कुमुदा शुगरने एफआरपीची रक्कम थकवल्याचा अहवाल पाठविला होता. या अहवालाची दखल घेऊन २२ एप्रिल २०१५ रोजी साखर आयुक्तांनी आरआरसी काढून कुमुदा शुगरने एफआरपीप्रमाणे ऊसबिल थकवलेल्या १ लाख २८ हजार टन ऊस बिलापोटी २५ कोटी ३६ लाख रक्कम वसुलीचे आदेश दिले होते.या आरआरसीच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी सातारा यांना प्राधिकृत करून जमीन महसुलाची थकबाकी समजून उत्पादीत केलेली साखर मोलॉसिस आणि बगॅस तसचे कुमुदा शुगरची स्थावर व जंगम मालमत्ता विहित पद्धतीने विक्री करून ऊसबिल देय बाकीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याबाबतच्या सूचनाही केलेल्या होत्या.जिल्हाधिकारी सातारा यांच्या वतीने कऱ्हाडचे प्रांताधिकारी किशोर पवार यांनी आरआरसीनुसार साखर, मोलॉसिस व बगॅसची विक्री करून थकित ऊस बिलापोटी १५ कोटी ४१ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले होते. अद्याप ही ९ कोटी ९५ लाख इतकी रक्कम शेतकऱ्यांना देयबाकी असल्याचे कळविण्यात आले होते. ही रक्कम मिळण्याकामी रयत कारखान्याचे व्यवस्थापन, शेतकरी तसेच शेतकरी संघटनांनी साखर आयुक्तांसह शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. याबाबत रयत साखर कारखाना व अनेक शेतकऱ्यांच्या कुमुदा शुगर विरुद्धच्या तक्रारी ठिकठिकाणी दाखल आहेत. या आदेशामुळे या प्रलंबित तक्रारी, दाव्यामध्येही गती मिळून कुमुदा शुगरच्या संचालक मंडळाचे फास आणखी आवळले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे एफआरपीनुसार ९ कोटी ९५ लाख ६४ हजार रक्कम वसुलीकामी कुमुदा शुगर यांचे संचालक मंडळाविरुद्ध सक्षम न्यायालयामध्ये तक्रार दाखल करण्यास व पुढील न्यायालयीन कामकाज करण्यासाठी प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे यांना आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाप्रमाणे सहसंचालक शशिकांत घोरपडे यांनी कार्यवाही सुरू केल्याचे समजते. (प्रतिनिधी)साखर आयुक्तांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. शुगर केन कंट्रोल आॅर्डरप्रमाणे ऊस गाळप करणाऱ्याची ऊसबिल देण्याची जबाबदारी असते. त्याप्रमाणे कुमुदा शुगरवर तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. २०१४-१५ हंगामात गाळपास आलेल्या उसाचे बिल एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. यासाठी आरआरसी काढण्यापासून शासनाने कुमुदा शुगर वरती तक्रार दाखल करण्याचा आदेश देईपर्यंत आम्ही ऊस पुरवठादार शेतकऱ्यांबरोबर होतो. आरआरसीसाठी न्यायालयात जाऊन तत्काळ आरआरसी काढावी, यासाठीही प्रयत्न केले होते.- गोपीचंद चव्हाण, संचालक,रयत सहकारी साखर कारखानामी २०१४-१५ हंगामात कुमुदाकडे ऊस पाठविला होता. माझी एफआरपीप्रमाणे रक्कम थकित होती. यासाठी आम्ही साखर आयुक्त, सांगली, कोल्हापूर, जिल्हाधिकारी यांच्याकडे कुमुदाच्या संचालकांची स्थावर जंगम मालमत्ता जप्त करावी व आमची बिल वसूल करून द्यावे. याकरिता पाठपुरवठा केला. कुमुदाच्या संचालक मंडळाच्या मालमत्तेची माहिती दिली होती. याकामी रयतच्या व्यवस्थापनाचेही पूर्ण सहकार्य मिळाले. - रमेश हंजे, शेतकरीकुमुदा शुगरने शेतकऱ्यांची पहिल्या पंधरवड्याचे बिले अदा केली होती. उर्वरित १ लाख २५ हजार मेट्रिक टनाचे उसबिल थकवल्याने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार साखर आयुक्तांनी आरआरसी काढावी. यासाठी प्रयत्न केले. मुजोर बनलेल्या कुमुदा शुगरच्या व्यवस्थापना विरोधात आमच्या कार्यकर्त्यांनी आरआरसी येईपर्यंत पंधरा दिवस साखर बंद ठेवण्याचे काम केले. यामध्ये अंकुश निकम, आनंदराव थोरात, जिकर बागवान, जयवंत थोरात, जयवंत पाटील यासह रयत कारखान्याचे कर्मचारी व व्यवस्थापनाचे ही सहकार्य लाभले. - विजय पाटील, जिल्हाध्यक्ष, क्रांतिसिंह नाना बिग्रेड