चाफळ : ‘सामाजिक बांधिलकी जोपासत लायन्स क्लब ऑफ इंडिया, मुंबई या संस्थेच्या माध्यमातून चाफळ विभागातील कवठेकरवाडी (ता. पाटण) येथील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप केले. संस्थेने राबवलेला हा उपक्रम स्तुत्य आहे,’ असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्या रूपाली पवार यांनी केले.
सहायक आयुक्त विनोद तावडे यांनी लायन्स क्लॅब ऑफ इंडिया मुंबई (जुहू) या संस्थेच्या माध्यमातून चाफळ विभागातील कवठेकरवाडी (ता. पाटण) शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी नाणेगाव बुद्रुकचे सरपंच नितीन मसुगडे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन किसन कवठेकर, सदस्य संतोष कवठेकर, रत्नमाला कवठेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, पंचायत समिती सदस्या रूपाली पवार, सरपंच नितीन मसुगडे, केंद्रप्रमुख अर्जुन पाटील यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमास केंद्रप्रमुख अर्जुन पाटील, मुख्याध्यापक दिलीप भंडारे, शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.