लसीकरणासाठी पालिकेतर्फे मंडप घालण्यात आला असून त्यासाठी अंगणवाडीची जागा आहे, तेथे वेटिंग रूम, निरीक्षण कक्ष तयार केला आहे. मंडपामध्ये कुलर, पंख्याची सोय आहे. आतापर्यंत सुमारे पाचशेजणांना कोरोनाची लस दिली असून त्यापैकी १५५ ज्येष्ठ नागरिक, तर ६० जण हायपर टेन्शन व मधुमेहाचे आहेत. कोवॅक्सिन १९ मार्चपासून चालू केले असून त्यामध्ये साठजणांना लस दिली आहे. त्यातील ३४ ज्येष्ठ नागरिक आहेत.
लसीकरण केंद्रास आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मुख्याधिकारी रमाकांत डाके, आरोग्यप्रमुख आर. डी. भालदार, वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल कुलकर्णी व समाजसेवक जयंत बेडेकर उपस्थित होते.
फोटो : २३केआरडी०१
कॅप्शन :
कऱ्हाडच्या नागरी आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणास प्रारंभ करण्यात आला आहे.