शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

रंग बदलला तरी म्हणे पाणी शुद्धच!

By admin | Updated: February 4, 2015 23:55 IST

कऱ्हाड पालिकेचा जावईशोध : कायमस्वरूपी उपाययोजना नाही; नागरिकही बुचकळ्यात

कऱ्हाड : शहराला दूषित पाणीपुरवठा होत असल्याची सर्वत्र ओरड सुरू असताना पालिकेने मात्र शहराला पुरविण्यात येणारे पाणी शंभर टक्के शुद्धच असल्याचा दावा केला आहे. पाण्याचा रंग बदलला असला तरी ते पाणी पूर्णपणे निर्जंतुक असल्याचेही पालिकेचे जलअभियंता छातीठोकपणे सांगत आहेत. पालिकेने लावलेल्या या जावईशोधामुळे नागरिक आणखी बुचकळ्यात पडले आहेत. कृष्णा नदीतील दूषित पाण्यामुळे कऱ्हाड शहरासह आसपासच्या गावांतील नागरिकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या नदीतील पाण्याचा रंग बदलला आहे. पाणी पिवळे व काळसर रंगाचे दिसत असून, ते अशुद्ध असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्पासाठी कृष्णा नदीचे पाणी टेंभूजवळ अडविण्यात आले आहे. या पाण्याचा फुगवटा कोयना नदीवरील नवीन पुलापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे नदीतील पाणी साचून राहिले असून ठिकठिकाणी शेवाळ साचले आहे. नदीपात्रात सांडपाणीही मिसळत असल्याने हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे अनेक संघटनांकडून सांगितले जात आहे. गढूळ व दुर्गंधीयुक्त पाण्याचा शहराला पुरवठा केला जात असल्याचा आरोपही संघटना करीत आहेत. यामुळे साथरोग पसरत असून, अनेकांना त्वचारोगाचा सामनाही करावा लागत आहे. कऱ्हाड शहर परिसरात लहान-मोठे उद्योग, हॉटेल, रूग्णालये तसेच अन्य प्रकल्प आहेत. या ठिकाणचे सांडपाणी नदीपात्रात सोडले जात आहे. त्याचबरोबर शहरातील बाराडबरी येथे एकत्रित करण्यात आलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र, तेथील कचरा साठविण्याची क्षमताही संपल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. शहरातील नाल्यांमधून ओला व सुका कचरा वाहत असल्याचे अनेकवेळा पाहावयास मिळाले आहे. तसेच मैलामिश्रित पाणीही नदीपात्रापर्यंत पोहोचत आहे. वास्तविक, नदीत मिसळणारे मैलामिश्रित पाणी नदीपर्यंत जाऊ न देता त्याची विल्हेवाट लावावी, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दोन वर्षांपूर्वीच सांगण्यात आले आहे. मात्र, पालिकेने दुर्लक्ष केले. आजपर्यंत पालिकेने त्याबाबत कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यातच काही दिवसांपासून शहराला पिवळसर काळा रंग चढलेल्या पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे. मनसेने याबाबत आवाज उठविला असला तरी शहराला पुरविण्यात येणारे पाणी शुद्ध असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. पालिकेच्या भूमिकेबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. (प्रतिनिधी)प्रदूषणाचा प्रश्न गंभीरटेंभू प्रकल्पानजीक झालेल्या पाणीसाठ्यापेक्षा इतर ठिकाणीही पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे. सातारा, वाई येथील पाणी वाहत या ठिकाणी येते. त्यामुळे पाणी प्रदूषणाचा विषय खूपच गंभीर आहे. टेंभू प्रकल्प बंद असतानाही येथे पाणी अडविले जाते, हे चुकीचे आहे. खासगी वीज कंपनीसाठी हे पाणी अडविले जात असून त्याला आमचा विरोध आहे. - सागर बर्गे, शहराध्यक्ष, मनसे