शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

देशोदेशीच्या टपाल तिकिटांचा संग्रह

By admin | Updated: March 8, 2016 00:30 IST

गीतांजली पाटील यांचा छंद : युद्धातील प्रसंगासह राज्याभिषेकाच्या प्रसंगांचा समावेश

कऱ्हाड : प्रत्येक व्यक्तीला एक छंद असतो. कोणी दुर्मीळ छायाचित्रे, शिवकालीन नाणी यांचा संग्रह करून ठेवतो. तर कुणी वेगवेगळी नाणी जमा करतो. कऱ्हाडातील गीतांजली पाटील यांनीही टपाल तिकीट व देशोदेशीची चलन संग्रहित करण्याचा छंद जपला आहे. विविध देशांतील नवे जुने पोस्टाची तिकिटे गीतांजली यांच्याकडे आहेत. गीतांजली यांनी डच आणि मेक्सीकोने महात्मा गांधीच्या सन्मानार्थ काढलेले टपाल तिकीट, १९४२ चे छोडो भारत आंदोलन, विमानाने अवकाशात प्रथम झेप घेतलेला क्षण, यासह उटीची रेडिओ दुर्बीण, हंम्पींचा रथ, ‘आयएनएस’ विक्रांत युद्धनौका, आर्यभट्ट उपग्रह आणि दूरध्वनीचा जन्मदाता ग्र^हमबेल, रूझवेल्ट, अब्राहम लिंकन, संत नामदेव, महर्षी कर्वे, राजर्षी शाहू आदी देशविदेशातील मान्यवरांच्या सन्मानार्थ काढलेला भारतासह सुमारे पंचवीस देशातील आठशेहून दुुर्मीळ टपाल तिकिटांचा संग्रह केला आहे. पाटील यांना घरातूनच मोठा राजकीय वारसा लाभला आहे. त्या दिवंगत दादासाहेब उंडाळकर यांच्या नातसून व जयसिंगराव पाटील यांच्या स्नूषा आहेत. त्यांचे पती अ‍ॅड. आनंदराव पाटील हे पंचायत समिती सदस्य आहेत. पाटील यांना स्वत:ला समाजकार्याची मोठी आवड आहे. गीतांजली यांच्या माहेरचे वातावरणही समाजसेवेचा वारसा जोपासणारे आहे.गीतांजली यांच्याजवळ भारतासह अमेरिका, सिलोन(सध्याचा श्रीलंका), रुमानिया, आॅस्ट्रेलिया, जपान, कॅ^नडा, नेपाळ, सिंगापूर, कतार, पाकिस्तान, कुवेत, केनिया, नेदरलँड, न्यूझीलंड, नामिबिया, मंगोलिया, मेक्सिको, डच आदींसह पंचवीसहून अधिक देशातील टपाल तिकिटे आहेत. संग्रहामध्ये लोकमान्य टिळकांचे दोन आण्यांचे सर्वात जुने तिकिट, पुण्याच्या फर्ग्युसन कॉ^लेजच्या शताब्दीनिमित्त काढलेल तिकीट, भूकंप इंजिनिअरांचे सहावे विश्वसंम्मेलन, कार्ल मार्क्स व दासक^ापिटल, रेडक्रॉस शताब्दी, परमवीर चक्र या सन्मान चिन्हांचे तिकीट, जोधपूर, वेलूर, किल्ला, राष्ट्रीय उद्यानाचा सुवर्ण महोत्सव, बारावी आंतरराष्ट्रीय मदा विज्ञान काँग्रेस, विश्व पुस्तक मेला, नागरी विमान सेवेची पन्नास वर्षे, महार रेजिमेंट, टेलिफोन सेवची शंभर वर्षे, नौसेना डाकयार्डची २५० वी जयंती, भगवान महावीरांची २५०० वी निर्वाण जयंती आदी उल्लेखनीय घटनांच्या सन्मानार्थ काढलेला तिकिटांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)परदेशी मैत्रिणींकडूनही मिळविली तिकिटेगीतांजली यांचे शिक्षण पुणे येथील सेंटमिरेज कान्व्हेंट येथे झाले. यावेळी त्यांच्या बरोबर अनेक परदेशी विद्यार्थिनी त्यांच्या मैत्रिणी होत्या. त्यांच्याकडून पाटील यांनी त्या-त्या देशातील टपाल तिकीट प्रयत्नपूर्वक मिळवून यासंग्रहात वाढ केली. पुढे सासरी येताना आवर्जून त्यांनी हा तिकिटांचा अनमोल खजिना सोबत आणला आणि सर्व प्रापंचिक व सामाजिकव्यापातून तो जतन करून वृंद्धीगत केला आहे. यापुढेही त्यामध्ये देशातील टपाल तिकिटांचा समावेश करण्याचा त्यांचा मानस आहे.वि. दा. सावरकर, प्रेमचंद्र, हेलनकेलर, चार्ल्सडार्विन, लेनिन, जमान लाल बजाज, अहिल्याबाई होळकर, श्रीनिवास रामानूज, जगदीशचंद्र्र बोस, नेताजी बोस आदी दिग्गजांच्या सन्मानार्थ काढलेली तिकिटे विशेष उल्लेखनीय आहेत. तर फॅमिली प्लनिंगचे महत्त्व दर्शवणारे हम दो हमारे दो, प्राणी, पक्षी, विविध प्रकारची झाडे यांची दुर्मीळ चित्रे असणारी तिकिटे, कला संस्कृतीच दर्शन घडविणारी कथ्थक, ओडिसीन, राजस्थानी, हस्तशील्प, मध्ययुगीन मूर्ती कला आदी तिकीटे या संग्रहाचे महात्म्य आधोेरखित करतात.