शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

घरांची पडझड, बंधारा वाहून गेला

By admin | Updated: August 3, 2014 22:44 IST

काळोशीत पावसाचा हाहाकार : अतोनात नुकसान

घरांची पडझड, बंधारा वाहून गेलाकाळोशीत पावसाचा हाहाकार : अतोनात नुकसानपरळी : परळी खोऱ्यातील काळोशी या गावातील कृषी विभागाच्या पाणलोट समितीतून बांधण्यात आलेल्या तीन लाखांचा बंधारा वाहून गेला आहे. हा बंधारा तीन महिन्यांपूर्वी बांधला होता. तो वाहून गेल्याने बंधाऱ्याखालील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.राज्य शासनाच्या वतीने सर्वत्र कृषी विभागाच्या माध्यमातून पाणलोट समितीची स्थापना करून विकास करण्याचे हाती घेतले पडिक जमिनीचे सपाटीकरण त्या सुपीक बनविणे, त्यांना बारा महिने पाणी मिळावे म्हणून दऱ्या, बंधारे बांधणे असे पाऊल उचलले. असाच बंधारा परळी खोऱ्यातील काळोशी गावात गेल्या तीन महिन्यांपूर्वी वाघजाई-काळंबा पाणलोट समितीच्या माध्यमातून बंधारे घटक विशेष निधीतून मागासवर्गीय लोकांसाठी बांधण्यात आला. परंतु सुमारे तीन लाख रुपये खर्च केलेला निधी जोरदार पाऊस आल्याने पाण्यात वाहून गेला आहे.जोरदार पाऊस आल्याने हा बंधारा वाहून गेला; परंतु हा बंधाऱ्याखाली असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी व माती वाहून गेल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामध्ये किसन निकम, विष्णू निकम, जोतिराम निकम या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी, अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. (वार्ताहर)बोरणे घाटात दरडी कोसळणे सुरूचपरळी : ठोसेघर परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे बोरणे घाटात छोट्या-छोट्या दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच असून, धबधबा पाहण्यास येणाऱ्या पर्यटकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे.गेल्या महिन्यांपासून ठोसेघर, परळी परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धबधबा ओसंडून वाहत आहे. धबधबा पाहण्यास जिल्ह्यातून नव्हे तर राज्यातून पर्यटक येत आहेत. परंतु जोरदार पाऊस असल्याने सातारा-ठोसेघर रस्त्यावरील बोरणे घाटात छोट्या-छोट्या दरडी कोसळ्याचे सत्र सुरूच आहे. या दरडीमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. छोटे-छोटे दगड, मातीचे ढिगारे रस्त्यावर असल्याने पर्यटकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. रस्त्याशेजारील नाल्यामध्ये माती पडल्याने पावसाचे पाणी पूर्ण रस्त्यावरून जात असल्याने दुचाकी चालकांच्या अंगावर चिखल उडाल्याने त्यांच्यामध्ये वादावादी होत आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने त्वरित जेसीबीच्या साह्याने काढण्यात यावी, अशी मागणी पर्यटकांमधून होत आहे.बोरणे घाटातील रस्ता खचल्याने काही दिवस ठोसेघर, जांबे परिसरातील एस.टी. बसेस सेवा बंद होती. परंतु, ती सेवा शनिवारी पासून सुरू झाली आहे. (वार्ताहर)