शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेचे दरवाजे दहा फुटांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 23:46 IST

कोयनानगर : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने बुधवारी रात्रीच्या सुमारास धरणाचे सहा वक्री दरवाजे दहा फुटांवर उघडण्यात ...

कोयनानगर : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने बुधवारी रात्रीच्या सुमारास धरणाचे सहा वक्री दरवाजे दहा फुटांवर उघडण्यात आले. त्याद्वारे नदीपात्रात सुमारे ८९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी, नदीचे पाणी पात्राबाहेर शेतात गेले असून, मूळगाव पूल, संगमनगर जुना पूल पाण्याखाली गेला आहे. तर नेरळे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. ऐन गणेशोत्सवात पुन्हा पूरस्थिती निर्माण होणार का, अशी भीती आहे.कोयना धरणाच्या सहा वक्री दरवाजांपैकी दोन दरवाजांतून दीड फुटाने सुरू असलेला विसर्ग मंगळवारी रात्री पुन्हा दोन फुटांवर करत सहा वक्री दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात आला. बुधवारी सकाळी सात वाजता धरणातील पाण्याची आवक वाढल्याने दरवाजे तीन फूट करण्यात आले. सकाळी साडेदहा वाजता धरणातील पाण्याची आवक ८६ हजार ५५७ क्युसेक झाल्याने सहावक्री दरवाजे सहा फुटांवर नेण्यात आले. आणि विसर्ग ५६ हजार ३७२ करण्यात आला. त्यानंतर साडेअकरा वाजता धरणाचे दरवाजे आठ फुटांवर करण्यात आले. त्याद्वारे नदीपात्रात ७३ हजार ६३ क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्याने कोयना नदीचे पाणी सखल भागात पसरले. तर सायंकाळी मूळगाव पूल पाण्याखाली गेला. संगमनगर जुना पूलही पाण्याखाली गेला असून, विसर्ग वाढल्यास मोरगिरी भागाला जोडणारा नेरळे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पाटण तालुक्यात चाकरमान्यांची संख्या मोठी असून, ही मंडळी गणपतीसाठी गावाकडे आली आहेत. तर काही येणार आहेत. ऐन गणेशोत्सव काळात पुरामुळे उत्साहाचा हिरमोड होण्याची शक्यता झाली आहे. पावसाचा जोर वाढत आहे. आणि धरणातील विसर्ग मोठा झाल्याने पूररेषेतील गावातील ग्रामस्थांमध्ये पुन्हा भीती निर्माण झाली आहे. पावसाचा जोर व आवक वाढत गेल्याने विसर्ग वाढविण्यात येणार आहे.सायंकाळी पाच वाजता पाणीपातळी २१६३.०१ फूट होती. धरणातील पाण्याची आवक ८२४२९ क्युसेक असून विसर्ग ७२ हजार ३९८ क्युसेक आहे. धरणात १०४.७२ टीएमसी पाणीसाठा आहे. गत चोवीस तासांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोयना ११९ मिलिमीटर (एकूण ६००४), नवजा १९१ मिलिमीटर (६७८३), महाबळेश्वर १६६ (६०७७) एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.