शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डे हवेलीत चोरट्यांचा पुन्हा धुडगूस; साडेतेरा तोळे लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 23:15 IST

कºहाड/कोपर्डे हवेली : कºहाड दक्षिणेतील टाळगाव आणि कासारशिरंबे गावात जबरी चोरी केल्यानंतर चोरट्यांच्या टोळीने आपला मोर्चा कºहाड उत्तरेतील गावांकडे ...

कºहाड/कोपर्डे हवेली : कºहाड दक्षिणेतील टाळगाव आणि कासारशिरंबे गावात जबरी चोरी केल्यानंतर चोरट्यांच्या टोळीने आपला मोर्चा कºहाड उत्तरेतील गावांकडे वळविला आहे. शनिवारी रात्री कोपर्डे हवेली येथे धुडगूस घालून त्यांनी साडेतेरा तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. तसेच अन्य घरांमध्ये घुसून चोरीचा प्रयत्न केला. या घटनेने कोपर्डेसह आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.ऐन दिवाळीत चोरट्यांनी तालुक्यातील टाळगाव आणि कासारशिरंबे गावामध्ये घुसून घरफोड्या केल्या होत्या. बुधवारी, दि. ७ रात्री ही घटना घडली होती. दोन घरांतून चोरट्यांनी सहा लाखांचे दागिने लंपास केले होते. ही घटना ताजी असतानाच शनिवारी रात्री कोपर्डे हवेलीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास चोरटे कोपर्ड हवेलीतील मुख्य रस्त्याच्याकडेलाच असलेल्या संगीता सुनील रसाळ यांच्या घरात घुसले. त्यांनी संगीता यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची चैन हिसकावून घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी गळ्यातील चैन ओढत असताना संगीता यांना जाग आली. मात्र, डोळ्यावर बॅटरीचा उजेड पाडल्याने त्यांना समोरचे काहीच दिसले नाही. तेव्हा संगीता यांनी चैन ओढून धरली होती. मात्र, चोरट्यांनी जोराचा हिसका दिल्याने त्यांच्या हातातून चैन सुटली. त्याचवेळी संगीता यांनी चोरट्यांच्या हातात असलेला लोखंडी गज पकडला. तसेच चैन परत मागितली. मात्र, चोरट्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवला. त्यामुळे संगीता यांनी गज सोडला. त्यामुळे चोरटे तेथून पसार झाले. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रानजीक असलेल्या रामचंद्र शिवाजी साळवे यांच्या घराकडे वळवला. त्यांनी दाराची कडी काढून आत प्रवेश केला. घरातील सर्वजण झोपेत असताना आतल्या खोलीत असलेल्या कपाटाचे दार उघडून त्यांनी कपाटातील ७० हजार रुपये किमतीचा तीन तोळ्यांचा राणीहार, ५० हजार रुपयांची अडीच तोळ्यांची मोहनमाळ, ३० हजारांचा दीड तोळे वजनाचा लक्ष्मीहार, ४० हजारांच्या दोन तोळ्यांच्या चैन, २० हजारांच्या एक तोळ्याच्या अंगठ्या यासह अन्य असे सुमारे बारा तोळ्यांचे दागिने आणि पाच हजारांची रोकड चोरून पोबारा केला.दरम्यान, रात्री रामचंद्र यांचे वडील शिवाजी यांना जाग आली. घरात चोरी झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरडा केला.