सातारा : साताºयासह परिसरात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सातारकरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.जिल्ह्यात गेल्या आठवड्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला होता. सरासरी चौदा अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरला होता. त्यानंतर शनिवारी वातावरणात अचानक बदल झाला. थंडीचे प्रमाण कमी झाले. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे सूर्यनारायणाचे दर्शनही घडले नाही. सोमवारीही सकाळपासून ढगाळ वातावरण आहे.जिल्ह्यातील फलटण तालुक्यात डेंग्यूने डोके वर काढलेले असतानाच साताºयातही आजारी पडणाºयांचे प्रमाण वाढले आहे. थंडी, ताप, अंग, डोके दुखीने सातारकर हैराण झाले आहेत. शेकडो सातारकर खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने दवाखान्यांमध्ये गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.
साताºयात ढगाळ वातावरण : रुग्णालयांमध्ये गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 18:32 IST
सातारा : साताºयासह परिसरात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.
साताºयात ढगाळ वातावरण : रुग्णालयांमध्ये गर्दी
ठळक मुद्दे वातावरणातील बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम फलटण तालुक्यात डेंग्यूने हैराण