शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
7
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
8
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
9
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
10
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
11
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
12
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
13
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
14
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
15
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
16
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
17
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
18
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
19
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
20
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"

फलटणमध्ये बंद तर खंडाळ्यात महामार्ग रोखला

By admin | Updated: April 2, 2015 00:41 IST

संतप्त रामराजे समर्थक रस्त्यावर उतरले; बसच्या काचा फोडल्या

फलटण : विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केल्याच्या निषेधार्थ बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राजेसमर्थकांनी फलटण बंद पुकारला होता. त्याला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. यामुळे जनजीवनावर परिणाम झाला. दरम्यान, या बंदवेळी एका बसच्या काचा फोडल्या. त्यानंतर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. खासदार उदयनराजे भोसले व रामराजे यांच्यात सध्या वाक्युद्ध सुरू आहे. त्यातूनच मंगळवारी साताऱ्यात उदयनराजे समर्थकांनी रामराजे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले होते. रामराजेंबद्दल अपशब्द वापरण्यात आले होते. याचे पडसाद फलटण शहरात उमटले. शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला होता. शहरातील सर्व दुकाने बंद होती. या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. यावेळी उपनगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, सोमाशेठ जाधव, नितीन भोसले, किशोर पवार, फिरोज आतार, जालिंदर जाधव, सुनील मठपती, आशिष अहिवळे आदी सहभागी झाले होते. दरम्यान, बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास बारामती पुलावर कॅनॉलजवळ भगवानगड-कोल्हापूर ही बस (एमएच १४ बीटी ३५५२) अज्ञात तिघांनी थांबविली. त्यानंतर या बसच्या काचा लाकडी दांडक्याने फोडण्यात आल्या. त्यानंतर संशयित पळून गेले. फलटण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. हवालदार ठाकूर तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)प्रवाशांचे हाल...बुधवारी दिवसभर फलटण शहरात बंद पाळण्यात आला. यामुळे नागरिकांचे हाल झाले तसेच जनजीवनही ठप्प झाले. रिक्षा बंद असल्याने प्रवशांचे हाल झाले. त्यांना पायी जाणे भाग पडले. भाजीविक्रेते, हॉटेल व्यावसायिक यांचे नुकसान झाले.उदयनराजे समर्थकांनी टायर पेटवून केला निषेध खंडाळा : विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरुध्द केलेल्या वक्तव्याचे पडसाद बुधवारी खंडळ्यातही उमटले. रामराजेंच्या वक्तव्याचा निषेध करीत उदयनराजे समर्थकांनी राष्ट्रीय महामार्गावर टायर पेटवून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, खंडाळा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आठ जणांना ताब्यात घेतले. या ठिकाणी उदयनराजे समर्थकांकडून असे काही होईल, हे माहीत नसल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. फलटणमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी पाणीवाटपाचा मुद्दा घेऊन रामराजेंवर टीकेची झोड उठविली होती. विधानपरिषदेच्या सभापतिपदावर विराजमान झाल्यानंतर रामराजेंनी या टीकेचा खरपूस समाचार घेत उदयनराजेंविरुद्ध भडक विधाने केली, त्यामुळे दोन राजेंमधील शाब्दिक चकमकीचा वाद कार्यकर्त्यांच्या रूपाने रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. केसुर्डी फाट्याजवळ महामार्गावर उदयनराजे समर्थक व शिवप्रताप माथाडी कामगार युनियनच्या कार्यकर्त्यांनी टायर पेटवून रास्ता रोको केला. याप्रकरणी पोलिसांनी शिवप्रताप युनियनचे लोणंद विभागप्रमुख किसन बोडरे, रणजित माने, सतीश मोटे, रियाज शेख, अनिल व्हटकर, सादिक शेख, विशाल ढमाळ, तेजस गाढवे या आठजणांना ताब्यात घेतले. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. (प्रतिनिधी)पोलिसांची धावपळउदयनराजे समर्थकांनी महामार्गावर टायर पेटविल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. या मार्गावरून पालकमंत्री विजय शिवतारे जाणार असल्याने जळलेले टायर ताबडतोब विझवून बाजूला करण्यात आले. खंडाळा रेस्क्यू टीमने मदत केली. शिरवळ ते खंडाळा अशा फेऱ्या चालू करून पाहणी करण्यात आली.