शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साडेआठ हजार दुकानांचे शटर क्लोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:53 IST

सातारा : सरकारमार्फत विदेशी कंपन्यांना व्यवसायासाठी दारे उघडली जात आहेत. या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बंद पाळला. जिल्ह्यातील साडेआठ हजार दुकाने शुक्रवारी बंद राहिली. व्यापाºयांच्या विविध संघटनांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे निवेदन सादर केले.सातारा मर्चंट चेंबर आॅफ कॉमर्स, किराणा रिटेलर असोसिएशन, डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा बंद पुकारण्यात आला होता. ...

सातारा : सरकारमार्फत विदेशी कंपन्यांना व्यवसायासाठी दारे उघडली जात आहेत. या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बंद पाळला. जिल्ह्यातील साडेआठ हजार दुकाने शुक्रवारी बंद राहिली. व्यापाºयांच्या विविध संघटनांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे निवेदन सादर केले.सातारा मर्चंट चेंबर आॅफ कॉमर्स, किराणा रिटेलर असोसिएशन, डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा बंद पुकारण्यात आला होता. या बंदला मेडिकल व्यावसायिकांनीही पाठिंबा दिला. सातारा शहर तसेच जिल्ह्यातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मर्चंट चेंबर आॅफ कॉमर्सचे राजू गोडसे, सुनील झंवर, अजित शहा, लालूशेठ सारडा, किराणा रिटेलर असोसिएशनचे अशोक बादापुरे, राकेश अग्रवाल, महेश भणगे, संदेश नागोरी, परेश दोशी, डिस्ट्रिब्युशन असोसिएशनचे प्रशांत जोशी, प्रदीप शहा, विजय नावंधर आदींनी आपल्या संघटनांच्या सभासदांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली.सरकारच्या धोरणामुळे छोटे व्यापारी उद्ध्वस्त होतील, असा आरोप यावेळी करण्यात आला. सातारा शहरातील सर्व किराणा व्यावसायिक या बंदमध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती राजू गोडसे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. परकीय थेट गुंतवणुकीत किरकोळ वस्तूंचे उत्पादन व्यापारास सरकारने पूर्ण मान्यता दिली. वॉलमार्टसारखी कंपनी भारतीय किरकोळ व्यापारात येत आहे. देशामध्ये सात कोटी व्यापारी आहेत. ४२ लाख कोटी रुपयांचा व्यापार होतो, तो उद्ध्वस्त होईल. नोटबंदी, जीएसटीच्या काळात सर्वाधिक त्रास या व्यापाºयांना झाला. मेक इन इंडियाचा नारा देणारे सरकार विदेशी कंपन्यांना पायघड्या घालून देशांतर्गत असणारा व्यापार मोडीत काढत आहे. व्यापारी करबुडवे आहे, असे सरकारला वाटते. एफडीआय मंजूर करू नये, यासाठी सरकारला १५ डिसेंबरपर्यंत संघटनेने मुदत दिली आहे.दरम्यान, या संपामुळे काही प्रमाणात नागरिकांची गैरसोय झाल्याचे पाहायला मिळाले.४० कोटी जनतेला झळ बसण्याची शक्यतादेशांतर्गत असणाºया व्यापारात सात कोटी व्यावसायिक कार्यरत आहेत. या व्यवसायावर ३० कोटी कामगार अवलंबून आहेत. तब्बल ३७ कोटी लोकांच्या जीवनमानाशी खेळण्याचा डाव सरकारने आखला असल्याची माहिती यावेळी व्यापाºयांनी दिली. विदेशी कंपन्यांना व्यवसाय करण्यास मुभा देऊन स्थानिक व्यापार मोडकळीस निघू शकतो. ज्या व्यापाºयांच्या जीवावर भाजप सरकार निवडून आले, त्याच व्यापाºयांना कोंडीत पकडण्याचा डाव आखला गेल्याचा आरोपही केला.