सातारा : कृषी विभागातील लिपिकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तहसील कार्यालयातील इतर कामे देण्यात आली आहेत. याचा निषेध करत लिपिकांनी दोन दिवस काळ्या फिती लावून काम केले. त्यानंतर सोमवारपासून सामूहिक रजा टाकून लिपिक संपावर गेले आहेत.
याबाबत महाराष्ट्र राज्य कृषी विभाग लिपिक संवर्ग संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, जिल्ह्यात लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांची ८९ पदे मंजूर आहेत. त्यामधील ४९ पदे भरलेली असून, ४० रिक्त आहेत. त्यानुसार उपविभाग, तालुकास्तरीय सर्व कार्यालयांमध्ये ५० टक्क्यांहून लिपिक पदे रिक्त आहेत. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने यामधील काही कर्मचाऱ्यांना तहसील कार्यालयातील कामासाठी घेतले आहे. अतिवृष्टीच्या कामासाठी घेतले असतानाही त्यांना विविध प्रकारची कामे लावण्यात येत आहेत. याला कर्मचाऱ्यांचा विरोध आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा निषेध कर्मचाऱ्यांनी केला. यासाठी मागील आठवड्यात गुरुवारी आणि शुक्रवारी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश रद्द न केल्याने सोमवारपासून लिपिक कर्मचारी सामूहिक रजेवर गेले आहेत.
फोटो ०६ सातारा ॲग्री फोटो...
फोटो ओळ : महाराष्ट्र राज्य कृषी विभाग लिपिक संवर्ग संघटनेच्या नेतृत्वाखाली कृषी विभागातील लिपिक सोमवारपासून सामूहिक रजेवर गेले आहेत.
...........................................................