शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

गोडोलीच्या मावळ्यांकडून मुंबईत स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : मुंबई येथील मराठा मोर्चात सहभागी झालेल्या साताºयातील अनेक मावळ्यांनी आपला सातारी बाणा तिथेही दाखविला. मोर्चानंतर त्यांनी आझाद मैदानाची स्वच्छताही केली.मुंबई येथे बुधवारी मराठा समाजाचा महामोर्चा पार पडला. या मोर्चाने गर्दीचा उच्चांक गाठला होता. महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश व परदेशातील मराठा समाजाने या मोर्चात सहभाग घेतला.मुंबईत अक्षरश: ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : मुंबई येथील मराठा मोर्चात सहभागी झालेल्या साताºयातील अनेक मावळ्यांनी आपला सातारी बाणा तिथेही दाखविला. मोर्चानंतर त्यांनी आझाद मैदानाची स्वच्छताही केली.मुंबई येथे बुधवारी मराठा समाजाचा महामोर्चा पार पडला. या मोर्चाने गर्दीचा उच्चांक गाठला होता. महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश व परदेशातील मराठा समाजाने या मोर्चात सहभाग घेतला.मुंबईत अक्षरश: मराठ्यांची लाट आलेली जगाने पाहिली. या लाटेचे फोटो सोशल मीडियातून तत्काळ व्हायरल झाले.मोर्चानंतर आझाद मैदानामध्ये पडलेले प्लास्टिक पिशव्या व इतर कचरा गोडोलीतील कार्यकर्त्यांनी उचलला. रवी पवार, गणेश निकम, प्रशांत मोरे, प्रशांत जाधव, हणमंत चव्हाण, दादा चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, युवराज जाधव, अमोल काटकर व त्यांचे इतर सहकारी या स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.मैदानात पडलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, कागद, पाण्याच्या बाटल्या असा कचरा उचलून त्यांनी तो कचराकुंड्यांत टाकला. सातारकर कुठेही गेले तरी स्वच्छतेच्या बाबतीत किती दक्ष आहेत, हेच यातून समोर आले.सातारकरांच्या या स्तुत्य उपक्रमाने मुंबईकरही भारावून गेले होते. सातारा शहरातही काही महिन्यांपूर्वी असाच मोर्चा निघाला होता.या मोर्चानंतर अवघ्या एक तासात बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी शहराची स्वच्छता केली होती.