शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

अनंत चतुर्दशीनंतर महागणपती घाटाची स्वच्छता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:44 IST

वाई : वाई शहरातील घरगुती गणपती मोठ्या भक्तिभावाने घाटावर विसर्जनासाठी आणतात. वाई नगरपालिकेने प्रत्येक घाटावर मूर्तिदानची सुविधा उपलब्ध केली ...

वाई : वाई शहरातील घरगुती गणपती मोठ्या भक्तिभावाने घाटावर विसर्जनासाठी आणतात. वाई नगरपालिकेने प्रत्येक घाटावर मूर्तिदानची सुविधा उपलब्ध केली होती. तसेच निर्माल्यदानची ही व्यवस्था केली होती. गेल्या दहा दिवसांत घाटावर अस्वछता झाली होती. वाई येथील शिवसह्याद्री अॅकॅडमीचे विध्यार्थी व पर्यावरणप्रेमी धावून आले आणि त्यांनी घाट स्वच्छ करून चकाचक केली. या वेळी नगरपालिका प्रशासनाने सहकार्य केले.

सोमवारी सकाळी शिवसह्याद्री अॅकॅडेमीचे ५० विद्यार्थी व १० विद्यार्थिनी स्वच्छता दूत म्हणून महागणपती घाटावर आले. त्यांनी सकाळी आठ वाजेपर्यंत महागणपती घाट स्वच्छ करून चकाचक केला. यावेळी पालिकेने कचरा संकलनासाठी दोन ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले. या वेळी दोन ट्रॉली कचरा काढण्यात आला व घाट पाण्यानी धुऊन काढला. अॅकॅडमीच्या माध्यमातून यापूर्वी ही सामाजिक उपक्रम राबविले आहे. यामध्ये रायरेश्वर, पसरणी घाट स्वच्छता, वृक्षारोपण, वणवा मुक्त डोंगर अभियान तसेच अतिवृष्टीमध्ये भूस्खलनग्रस्त गावांना मदत पोहोचविणे अशा विधायक काम करत असल्याची माहिती प्रशांत डोंगरे यांनी दिली.

वास्तविक पाहता वाई तालुक्याची भाग्यरेषा असणारी कृष्णा नदी, सांडपाणी सरळ नदीत सोडल्याने स्वच्छतेला आवाहन देत आहे. वास्तविक पाहता सांडपाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना केल्यास नदीस्वच्छतेचा प्रश्न बहुतांशी निकाली निघेल. स्वच्छता अभियानात या वेळी प्रशांत डोंगरे, ओंकार सपकाळ, राजेंद्र खरात या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

(चौकट)

कृष्णा नदी व त्यावरील घाट यांचे पावित्र्य राखणे गरजेचे आहे. नदीपात्रालगतच्या महागणपती घाटावर घाटावर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता झाली होती. अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी दोन तास अभियान राबून स्वच्छता केल्याने घाट स्वच्छ झाला नागरिक, पर्यटक यांनी कचरा कुठे ही टाकू नये नदीची व घाटावर स्वच्छता राखली पाहिजे आहे.

-राजेंद्र खरात, प्रशिक्षक, शिवसह्याद्री अॅकॅडमी, वाई

२२वाई गणपती घाट