शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवाना फ्लेक्समुळे शहर विद्रुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:03 IST

सातारा : सातारा शहरात विनापरवाना फ्लेक्स बोर्ड लावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून, शहरही विद्रुप होऊ लागले आहे. या ...

सातारा : सातारा शहरात विनापरवाना फ्लेक्स बोर्ड लावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून, शहरही विद्रुप होऊ लागले आहे. या फुकट्या जाहिरातदारांमुळे पालिकेचा लाखो रुपयांचा महसूल मात्र बुडत आहे.

सातारा हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. विविध शासकीय कार्यालय, महाविद्यालये, औद्योगिक वसाहत यांसह अनेक खासगी बॅँका व संस्थांची मुख्य कार्यालये या ठिकाणी आहेत. येथील बाजारपेठही सर्वांत मोठी असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची येथे सतत रेलचेल सुरू असते. या नागरिकांना आकर्षित करण्यासाठी काही जाहिरातदारांकडून पालिका व पोलीस प्रशासनाची रीतसर परवानगी घेऊन फ्लेक्स बोर्ड लावले जातात. मात्र, अनेकांना याचा विसर पडल्याचे दिसते.

पालिकेची परवानगी न घेता शहरातील मुख्य रस्ते, चौक, विजेचे खांब, शासकीय इमारती, फूटपाथ तसेच झाडांवर फ्लेक्सबोर्ड लावले जात आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने शहराचे रूप बकाल होऊ लागले आहे. पालिकेकडून फ्लेक्सबोर्ड जप्तीची कारवाई सातत्याने केली जात असली तरी याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. काही दिवसांत परिस्थिती ‘जैसे थे’ होत असल्याने पालिकेला लाखोंच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे.

(चौकट)

पालिकेकडून कारवाई

- शहरात सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना फ्लेक्स बोर्ड लावणाऱ्यांवर पालिका प्रशासनाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. संबंधितांचे फ्लेक्स बोर्डही जप्त केले जातात.

- पालिकेकडून दंडात्मक कारवाई होत नसल्याने संबंधित दुकानदार, व्यावसायिक निर्धास्त झाले आहेत. कारवाई थांबली की, संबंधितांकडून पुन्हा एकदा आहे त्या जागेवर फ्लेक्स बोर्ड लावले जातात.

- शहरातील राजपथ, कर्मवीर पथ, राजवाडा, खणआळी, बसस्थानक परिसरात फुकट्या जाहिरातदारांची संख्या सर्वाधिक आहे.

(चौकट)

वार्षिक दीड लाखांचा महसूल

सातारा पालिकेला जाहिरात फलकांच्या माध्यमातून वार्षिक चार ते पाच लाखांचा महसूल मिळणे अपेक्षित आहे. मात्र, विनापरवाना जाहिरात फलक लावणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने पालिकेच्या तिजोरीत वर्षाकाठी केवळ दीड ते दोन लाखांचा महसूल जमा होत आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन पालिका प्रशासनाला ठोस पावले उचलावी लागणार आहेत.

(कोट)

विनापरवाना फ्लेक्स बोर्ड लावणाऱ्यांवर वेळोवेळी कारवाई केली जात आहे. जर कोणी विनापरवानगी जाहिरात फलक लावले असतील तर ते त्वरित काढून घ्यावे, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.

- प्रशांत निकम

अतिक्रमण विभागप्रमुख

(कोट)

शहरातील अशी एकही गल्ली व रस्ता नाही जिथे जाहिरात फलक दिसणार नाही. इमारती, दुकाने, विजेचे खांब एवढंच काय तर झाडांवरदेखील असे फलक झळकू लागले आहेत. या फलकामुळे सातारा शहराचे रूप मात्र बकाल होऊ लागले आहे.

- श्रीरंग काटेकर, सातारा

फोटो : जावेद खान