शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या कोरोनामुळे फलटण शहर आठ दिवस पूर्ण बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:32 IST

फलटण : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोना बाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी संपूर्ण फलटण ...

फलटण : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोना बाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी संपूर्ण फलटण शहरासह तालुक्यातील आठ गावांत २ ते ८ मे दरम्यान प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) घोषित केले आहे. दवाखाने व औषध दुकाने वगळता बँक, दूध, भाजीपाला, किराणा या अत्यावश्यक सेवांसह सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्या आदेशानुसार संपूर्ण फलटण शहर आणि तालुक्यातील कोळकी, फरांदवाङी, साखरवाङी, वाठार निंबाळकर, वाखरी, जाधववाङी, विडणी आणि तरडगाव या आठ गावातील प्रतिबंधीत क्षेत्रात सर्व नियमांचे काटेकोर पालन आणि कायदा सुव्यवस्था परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात करण्यात आला आहे. कोणीही घराबाहेर न पडता घरातच थांबून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जगताप यांंनी केले.

प्रतिबंधीत क्षेत्रात किराणा, दूध, फळे भाजीपाला घरपोहोच देण्याची व्यवस्था करण्यात येत असून, त्यांच्या अंमलबजावणीसाठी नगरपरिषदेने खास अधिकाऱ्यांची वॉर्डनिहाय नियुक्ती केली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली आहे.

हे सर्व शहराच्या विविध भागांतील असल्याने जवळपास संपूर्ण शहरात रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण फलटण शहर प्रतिबंधीत क्षेत्र घोषित केल्याचे तसेच तालुक्यातील ८ गावातही विविध भागात बाधीत रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रतिबंधीत क्षेत्र घोषित केल्याचे प्रांताधिकारी जगताप यांनी सांगितले.

चौकट :

धडकन वाढविणारे आकडे

फलटण शहरात २६ एप्रिल रोजी ६६ कोरोना बाधित आणि ८१२ सक्रिय, दि. २७ रोजी ४६ कोरोना बाधित आणि ७७८ सक्रिय, दि. २८ एप्रिल रोजी ५० बाधित आणि ७४७ सक्रिय, दि. २९ रोजी ५२ बाधित आणि ७९२ सक्रिय रुग्ण आढळले आहेत. फलटण शहरात २६ एप्रिल रोजी ६६ कोरोना बाधित आणि ८१२ सक्रिय, दि. २७ रोजी ४६ कोरोना बाधित आणि ७७८ सक्रिय, दि. २८ एप्रिल रोजी ५० बाधित आणि ७४७ सक्रिय, दि. २९ रोजी ५२ बाधित आणि ७९२ सक्रिय रुग्ण आढळले आहेत.