शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
3
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
4
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
5
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सभागृहात सवाल
6
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
7
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
8
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
9
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
10
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
11
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
12
"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस
13
Astro Tips: मोगऱ्याचा गजरा आणि प्रिय व्यक्ती, शुक्रवारी करा 'हा' उपाय, वाढवा घरची श्रीमंती!
14
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
15
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
16
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!
17
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
18
SEBI ची मोठी कारवाई, शेअर बाजारात या कंपनीला बंदी; ₹४८४३ कोटींचा नफाही होणार जप्त
19
Viral Video: इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ पाहून अंगाचा थरकाप उडेल!
20
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण

बाराशे स्वयंसेवकांचे संचलन

By admin | Updated: January 12, 2015 01:31 IST

संघाचे शक्तिप्रदर्शन : साताऱ्यात प्रथमच मोठा सहभाग; महारांगोळ्या, पुष्पवृष्टी, आतषबाजी

सातारा : ‘जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय...’ यासारख्या घोषणांनी सातारा शहर दणाणून गेले. निमित्त होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाचे. यामध्ये सुमारे १२०० जण सहभागी झाले होते. प्रथमच मोठ्या प्रमाणावर हे संचलन झाले. या पथसंचलनादरम्यान महारांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. जागोजागी पुष्पवृष्टी करण्यात येत होती. फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने रविवारी दुपारी ३ वाजता शहरातून प्रथमच मोठ्या स्वरूपात झालेल्या भव्य पथसंचलनाच्यावेळी शेकडो स्वयंसेवक संचलन मार्गावर आले आणि त्यांनी शिस्तबद्ध संचलन केले. यावेळी सातारकरांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. महारांगोळ्या, पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतषबाजी आणि त्यात होत असलेले स्वयंसेवकांचे नेत्रदीपक संचलन अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले. आज यावर्षी प्रथमच झालेल्या संपूर्ण सातारा जिल्ह्यातील स्वयंसेवकांच्या एकत्रित पथसंचलनात जिल्ह्यातून सुमारे १२०० स्वयंसेवक संघाच्या गणवेशात या संचलनात सहभागी झाले होते. संघाचे अखिल भारतीय सेवा विभाग प्रमुख सुहास हिरेमठ यांच्यासह जिल्हा संघचालक डॉ. सुभाष दर्भे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोटेश्वर मैदान येथे वाहिनी अर्थात स्वयंसेवकांच्या समूहाचे नेटके व शिस्तबद्ध कवायत रांगा लावून झाल्यावर संघाचा ध्वज उभारण्यात आला. तसेच ध्वजवंदन व प्रार्थना होऊन घोषपथकाने अग्रभागी या संचलनाचा ताबा घेतल्यावर हे संचलन सुरू झाले. संचलनाच्या मध्यभागी मुलांनी सजविलेल्या विशेष वाहन रथात छ. शिवाजी महाराज, गोळवलकर गुरुजी व डॉ. हेडगेवार यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर एकूण १३ समूहातील पांढरा शर्ट, खाकी चड्डी आणि काळी टोपीसह गणवेशधारी व हातात दंड असलेले हे स्वयंसेवक स्वदेश रचनांवरील घोष पथकांच्या तालावर संचलनात मार्गक्रमण करत होते. सातारा जिल्ह्याबरोबरच सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी येथील संघाची घोष पथके व स्वयंसेवक या संचलनात सहभागी झाली होती. संघाचे अखिल भारतीय सेवा विभाग प्रमुख सुहास हिरेमठ यांच्या मार्गदर्शनानंतर या संचलन सोहळ्याची सांगता झाली. (प्रतिनिधी)