शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

‘सीआयडी’ करमाळ्यात

By admin | Updated: June 22, 2016 00:12 IST

आणखी काही आरोपी : ‘त्या’ पाचजणांना अटक शक्य

कऱ्हाड : पोलिसांच्या ताब्यातील संशयिताच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी गुप्तचर विभागाचे पथक मंगळवारी करमाळा (ता. सोलापूर) येथे गेले. दोन दिवस त्या ठिकाणी तपास केला जाणार असून, नातेवाइकांचे जबाब नोंदविले जाण्याची शक्यता आहे. तसेच संपूर्ण घटनाक्रमही फिर्यादीकडून पुन्हा एकदा स्पष्ट केला जाणार असल्याचे समजते. दरम्यान, तपासात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असल्याचे गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले.संशयित रावसाहेब जाधव याच्या खूनप्रकरणात प्रथमदर्शनी पोलिस निरीक्षक विकास धस, सहायक पोलिस निरीक्षक हणमंत काकंडकी यांच्यासह पाचजण निष्पन्न झाले आहेत. त्यांच्या अटकेसाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सोने-चांदी व्यापाऱ्याकडील ७७ लाखांचे अडीच किलो सोने चोरीस गेल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणात संशयित म्हणून रावसाहेब लक्ष्मण जाधव (वय ४२, रा. निंभोरे, ता. करमाळा, जि. सोलापूर) याचे नाव समोर आले. प्रकटीकरणचे पथक करमाळ्याला गेले. तेथून त्यांनी रावसाहेब जाधवसह अनिल डिकोळे याला ताब्यात घेतले. दोघांनाही कऱ्हाडला आणून कार्वे नाका पोलिस चौकीत बसविण्यात आले. त्याठिकाणी पोलिस निरीक्षक विकास धस, सहायक निरीक्षक काकंडकी यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी दोघांनाही बेदम मारहाण केली. या मारहाणीतच रावसाहेब जाधवचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, या मागणीसाठी सोमवारी कऱ्हाडात मोर्चाही काढण्यात आला. त्यानंतर सोमवारी सायंकाळी अनिल डिकोळे याच्या फिर्यादीनुसार विकास धस, हणमंत काकंडकी यांच्यासह इतरांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी या प्रकरणाच्या तपासासाठी ‘सीआयडी’चे पथक करमाळ्याला गेले आहे. (प्रतिनिधी)जाधववर निंभोरेत अंत्यसंस्कार पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमवारी रात्री नातेवाइकांनी रावसाहेब जाधव यांचा मृतदेह ताब्यात घेतला. मध्यरात्री मिरजमधून मृतदेह घेऊन रुग्णवाहिका करमाळ्याला रवाना झाली. पहाटे तीन वाजता ती निंभोरे येथे पोहोचली. त्यानंतर सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.