शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

चौपाटी ‘गॅस’वर; जिभेचे चोचले महागणार!

By admin | Updated: March 2, 2017 23:43 IST

व्यवसायासाठी दीडशे रुपयांनी वाढ : अनुदान नाकारलेल्या ग्राहकांना ८६ रुपयांचा बोजा; शेवटी फटका सातारकरांना

सातारा : लादी पावात झालेल्या दरवाढीमुळे वडापाव, कच्छी दाबेली यासारख्या पदार्थांच्या किमतीत महिन्यापूर्वी वाढ झालेली असतानाच हॉटेल, हातगाडी धारकांना आणखी एक धक्का बसला आहे. व्यवसायासाठी वापरला जात असलेला १९ किलोचा गॅस सिलिंडर तब्बल १४९.५० पैशांनी महागला आहे. त्यामुळे त्याचा चटका खवय्ये ग्राहकांनाही सोसावा लागणार की काय?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार हजारो ग्राहकांनी गॅसवरील अनुदान प्रामाणिकपणे नाकारले. अशा विनाअनुदानित गॅस दरातही वाढ करण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला. त्यामुळे १४.३ किलोच्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरला आता ६९१ ऐवजी ७७७ रुपये मोजावे लागणार आहेत. यामध्ये ८६ रुपयांची वाढ झाली असल्याने गृहिणींच्या बजेटवर परिणाम होणार आहे. सातारा जिल्ह्यात खवय्येगिरींची संख्या मोठी आहे. त्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगारांनी चौकाचौकात वडापाव, सामोसेचे गाडे टाकले आहेत. यातील नव्वद टक्के गाड्यांवर व्यवसायासाठीच्या १९ किलो वजनाचा सिलिंडर वापरला जातो. हा सिलिंडर वापरणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठाच दणका दिला आहे. या सिलिंडरच्या दरात तब्बल १४९.५० पैशांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. त्यामुळे साहजिकच हॉटेल व्यावसायिक खाद्य पदार्थांच्या दरात वाढ करून ग्राहकांना झळ बसवू शकतात. अनेकांच्या घरात गॅस गिझर आहे. त्यासाठी विनाअनुदानितचा गॅस वापरला जातो. तो महागल्यास गार पाण्यानेच अंघोळ करण्याची वेळ येणार आहे. गॅस सिलिंडरमधील दरवाढीमुळे जिल्ह्यातील सर्वसामान्यांमधून तीव्र नाराजीचा सुर उमटत आहे. (प्रतिनिधी)