शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

दराअभावी कांदा पुन्हा शिवारातल्या चाळीत!

By admin | Updated: May 6, 2016 01:17 IST

शेतकरी चिंतेत : दुष्काळात तेरावा महिना त्याप्रमाणे अवस्था; शेतकऱ्यांना खर्चाचा ताळमेळ जमेना

खटाव : एकीकडे दुष्काळी परिस्थितीशी सामना करणाऱ्या शेतकरी वर्गाला बिकट आर्थिक परिस्थिीला ही तोंड द्यावे लागत आहे. बाजारात कांद्याचे भाव वधारल्यानंतर बऱ्याच शेतकरी वर्गाने कांद्याची लागवड केली. कांद्याचे उत्पादनही वाढले; परंतु बाजारात कांद्याचे भाव उतरल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. तर बहुतांश शेतकरी वर्गाने निघालेला कांदा चाळीत भरून ठेवला आहे. कांदा हे पीक बागायती म्हणून ओळखले जाते. खटाव तालुक्यात बहुतांश शेतकरी कांद्याची लागवड करतात. कांदा लागवडी पासून ते त्याच्या काढणीपर्यंत शेतकरी वर्गाला येणारा खर्च पाहता आज कांद्याला बाजारात मिळणारा दर आणि झालेला खर्च यांचा ताळमेळ घातला तर शेतकरी वर्ग पुरता अडचणीत येत आहे. एक वेळ कांद्याचा उच्चांकी दर झाल्यानंतर पुन्हा कांद्याचे भाव गडगडल्यामुळे शेतकरी वर्गाने आता उत्पादित केलेला कांदा चाळीत भरण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पादन खर्च आणि विक्रीतून येणारी रक्कम पाहता झालेला खर्चही निघत नसल्यामुळे योग्य दर येईपर्यंत तो सुरक्षित कांदा चाळीत ठेवण्याचा निर्णय शेतकरी वर्गाने घेतला आहे. रब्बी हंगामात ज्यांना पाण्याची सोय आहे त्या शेतकरी वर्गाने कांद्याची लागण केली आणि ज्याच्याकडे ती सोय नाही त्यांनी रब्बी ज्वारी, गव्हाचे उत्पादन केले; परंतु कांदा उत्पादन केलेल्या शेतकऱ्याला मात्र या उतरलेल्या दरामुळे आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. घरात असणाऱ्या दुभत्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न त्यांना भेडसावू लागला आहे. सध्या तरी शेतकरी वर्गाने कांदाचाळीचा आधार घेऊन कांदा ठेवला आहे. आता त्याला प्रतीक्षा आहे, ती बाजारात दर वाढण्याची. (प्रतिनिधी)