शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरड्यांबरोबरच मोठीही पारंपरिक खेळात हरपली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 22:55 IST

सातारा : सिमेंटच्या जंगलात अंगण हरपतंय अन् मोबाईल, कॉम्प्युटरमुळे मातीतले खेळ लुप्त होऊ लागले. या खेळांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी सातारा हिल मॅरेथॉन असोसिएशनच्या वतीने शाहू स्टेडियममध्ये पारंपरिक खेळांचे आयोजन केले होते. यामध्ये लहानांबरोबरच मोठेही खेळात रंगले होते. या खेळात सहभागी होण्याचा मोह वरुणराजालाही आवरला नाही अन् त्याच्या संगतीनंच चिखलात रस्सीखेचचा ...

सातारा : सिमेंटच्या जंगलात अंगण हरपतंय अन् मोबाईल, कॉम्प्युटरमुळे मातीतले खेळ लुप्त होऊ लागले. या खेळांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी सातारा हिल मॅरेथॉन असोसिएशनच्या वतीने शाहू स्टेडियममध्ये पारंपरिक खेळांचे आयोजन केले होते. यामध्ये लहानांबरोबरच मोठेही खेळात रंगले होते. या खेळात सहभागी होण्याचा मोह वरुणराजालाही आवरला नाही अन् त्याच्या संगतीनंच चिखलात रस्सीखेचचा खेळ रंगला.सातारा हिल मॅरेथॉन असोसिएशनने रविवारी आयोजित केलेल्या पारंपरिक खेळात चिमुरड्यांपेक्षा मोठीच मंडळी जास्त रमली. विटी दांडू, भोवरा खेळण्यात पुरुष मंडळी तर महिला झिबल्या खेळताना दिसत होत्या.कॉम्प्युटर, व्हिडीओ गेम, चेस या खेळांमध्ये दंग झालेली आजची पिढी मातीतले खेळच विसरली आहेत. त्यामुळे मातीची नाळ कमी होत चालली आहे. त्यांचा व्यायाम खुंटल्याने शारीरिक क्षमता कमी होत चालली आहे. त्यांच्यामध्ये खेळाविषयी आवड निर्माण व्हावी, मोठ्यांना जुने खेळ खेळण्याची संधी मिळावी म्हणून सातारा हिल मॅरेथॉन असोसिएशनतर्फे रविवारी पारंपरिक खेळ आयोजित केले होते.जुने खेळ खेळण्याची संधी मिळाल्याने कधी एकदा या साधनांना हात लावू, असे अनेकांना झाले होते. आवडीचा खेळ ताब्यात घेण्यात व आपण मित्रांना कसे वरचढ होत होतो, हे सोबत आणलेल्या नातवंडांना रंगून सांगतानाही आजोबा दिसत होते. गोट्या, लंगडी, लगोर, भोवरा, विटी-दांडू, टायरगेम, सॅकसेर असे पारंपरिक खेळ खेळताना अनेकजण दिसत होते.७५ किलोचा भलामोठा भोवरायामध्ये ७५ किलोचा भलामोठा भोवरा ठेवण्यात आला होता. अनेकजण तो कुतूहलाने पाहत होते. अनेकांनी तो फिरवण्याचा आनंद घेतला.