शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांना भेटले छोटा भीम, ट्यूटी

By admin | Updated: June 16, 2015 01:22 IST

पहिली घंटा वाजली : जिल्ह्यातील ४५ शाळांंमध्ये ‘लोकमत’तर्फे उत्स्फूर्त स्वागत

सातारा : सोमवार, दि. १५ जून... शाळेचा पहिला दिवस... शाळेला जाण्यापूर्वीच हृदयात धडधड अन् काहीचे हिरमुसलेले चेहरे... तरीही आईचा पदर, बाबांचा हात धरून काही चिमुरडे शाळेत दाखल झाले. आयुष्यभर शिक्षणाच्या प्रक्रियेला सोमवारी सुरुवात करणार असल्याने त्यांचं स्वागत करण्यासाठी जिल्ह्यातील ४५ शाळांमध्ये दाखल झाली ‘लोकमत’ची टीम. ‘लोकमत’ टीमसोबत आलेले ‘छोटा भीम अन् ट्यूटी’ला पाहून सारेच हरकले.नवा कोरा गणवेश, छान दप्तर घेऊन हजारो मुलं सोमवारी शाळांमध्ये दाखल झाली. महिना दीड महिन्यांनंतर जुने मित्र भेटणार म्हणून जुन्या विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. तर पहिलीच्या वर्गात प्रवेश घेऊन शालेय जीवनाचा श्रीगणेशा करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. गत दीड महिना शांत राहिलेले शाळेचे मैदानेही सोमवारी मुलांच्या किलबिलाटामुळे फुलले होते.शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याची परंपरा ‘लोकमत’ने यंदाही कायम ठेवली. जिल्ह्यातील ४५ शाळांमध्ये सकाळपासून ‘लोकमत’ची टीम शाळेत गेली होती. त्याठिकाणी गेल्यानंतर मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती तसेच शिक्षकांना भावी शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर वर्गावर जाऊन मुलांचे स्वागत केले. ‘लोकमत’तर्फे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक संतोष भोगशेट्टी, आवृत्ती प्रमुख सचिन जवळकोटे यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)