शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांच्या हाती चक्क कोयनेचा पाऊस!

By admin | Updated: July 6, 2014 00:31 IST

कोयनानगरमध्ये पोरखेळ : मुले ओततायत पर्जन्यमापकात पाणी

धीरज कदम, कोयनानगर : ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय,’ असा प्रश्न बालगीतातून विचारणाऱ्या चिमुकल्यांनी चक्क पर्जन्यमापकात बाटलीनं पाण्याची धार ओतून मुसळधार पाऊस पडल्याची नोंद करण्याचा चमत्कार केलाय खरा; पण या बाललीलांमुळे चुकीची आकडेवारी नोंद होऊन डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोयना परिसरात पडणाऱ्या पावसाच्या आकडेवारीवरूनच वीजनिर्मितीचं गणित सोडविलं जातं. पाऊस कमी झाला तर राज्यावर वीजटंचाईचं संकट येणार आणि त्याचा फटका उद्योगधंद्यांना बसणार, याची चिंता असल्यामुळे पावसाळ्यात त्यामुळे कोयना धरण क्षेत्रात किती पाऊस झाला, याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतं. साहजिकच कोयना धरण व्यवस्थापनावर पावसाची अचूक आकडेवारी ठेवण्याची मोठी जबाबदारी आहे. पर्जन्यमापन केंद्रांवर गेल्या वर्षीपर्यंत पावसाची नोंद ठेवण्याचे काम पर्जन्यमापक करत होते. पावसाळ्यात हे कर्मचारी स्वत: रोज पडणाऱ्या पावसाची आकडेवारी घेऊन त्याच्या अचूक नोंदी ठेवत असत. मात्र, यंदा त्यांना घरी बसवून कोयना धरण क्षेत्रात येणाऱ्या कोयनानगर, नवजा, महाबळेश्वर, प्रतापगड, बामणोली येथील केंद्रांवर अत्याधुनिक पर्जन्यमापन यंत्रणा बसविली आहे. यामुळे हवी तेव्हा पावसाची माहिती मिळत आहे. ही यंत्रणा स्वयंचलित असल्यामुळे त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. याचाच फायदा लहान मुले उठविताना दिसत आहे. खेळता-खेळता मुले पर्जन्यमापकाच्या भांड्याजवळ जातात आणि त्यात पाणी ओततात. या प्रकारामुळे पावसाची अचूक आकडेवारी मिळेल का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.सुरक्षेचे तीन तेरानवीन पर्जन्यमापन यंत्रणेमुळे हवी तेव्हा पावसाची आकडेवारी मिळत असली तरी त्याच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजल्याचे पाहावयास मिळत आहे. लहान मुले पर्जन्यमापन यंत्राजवळ जातात आणि खेळता-खेळता त्या यंत्राच्या भांड्यात पाणी ओततात. त्यामुळे अनेकदा पावसाची आकडेवारी चुकीची नोंद होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात तासा-तासाला पडणाऱ्या पावसाची नोंद ठेवावी लागते. वेळोवेळी येथील पावसाची आकडेवारी विविध शासकीय कार्यालयांना द्यावी लागते. त्यामुळे पर्जन्यमापन हे जबाबदारीचे काम असून अचूक नोंद करण्याची मोठी जबाबदारी असते.