शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चिमणराव कदम यांना मोबाईलवरून धमकी

By admin | Updated: July 7, 2014 23:06 IST

पोलिसांत गुन्हा : ‘राजेंना विरोध का करतो, सोडणार नाही’ म्हणत दमदाटी

फलटण : ‘राजेंना विरोध का करतो, सोडणार नाही,’ असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करीत माजी आमदार चिमणराव कदम यांना मोबाईलवरून धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.फलटण शहरात वाढत्या गुंडगिरीचा, चोरट्यांचा त्रास जनतेला होत असतानाही तसाच त्रास आता लोकप्रतिनिधी व ज्येष्ठ नेत्यांनाही धमकाविण्यापर्यंत होऊ लागल्याने कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुशांत निंबाळकर व कुटुंबीयांना शनिवारी (दि. ५) मारहाण झाली होती. तसेच सातारा येथील एका पत्रकाराला पिस्तूल लावून धमकावण्याचाही प्रकार घडला होता. याचा निषेध म्हणून आज सोमवारी सायंकाळी सर्वपक्षीय निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर आज (दि. ७) दुपारी २ वाजून १८ मिनिटांनी माजी आमदार चिमणराव कदम यांना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने मोबाईल (७७१९९२०९०८)वरून फोन करून ‘तू आमच्या राजेंना का विरोध करतो, तुला सोडणार नाही,’ असे सांगत अश्लील भाषेत शिवीगाळ करीत दमदाटी केली.या घटनेची फिर्याद माजी आमदार चिमणराव ऊर्फ सूर्याजीराव कदम (वय ७५) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा दिली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात कलम २९४, ५०४, ५०६, ५०७ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी कदम यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. फलटण ठाण्याचे पोलीस निरीक्षक फडतरे तपास करत आहेत.