शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

बालिकेची व्यथा... दुष्काळाची कथा!

By admin | Updated: October 27, 2015 23:56 IST

रहिमतपूर रांगोळी स्पर्धा : रंगावलीच्या माध्यमातून स्पर्धकांनी टाकला विविध सामाजिक प्रश्नांवर प्रकाशझोत --लोकमत माध्यम प्रायोजक

रहिमतपूर : स्त्रीभ्रूणहत्येचा तोडा पाश, आम्हासही जगण्याची आहे आस, अशी व्यथा सांगत मुलींना जगण्याचा अधिकार नाकारणाऱ्या व्यवस्थेवर भाष्य करणारी आणि दुष्काळात भरडलेल्या शेतकऱ्यांची कथा सांगणारी रांगोळी रेखाटून स्पर्धकांनी सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकला. निमित्त होतं राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेचं.रहिमतपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेचे ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक आहे. राज्यभरातील सहभागी स्पर्धकांनी विविध सामाजिक विषय रांगोळीतून मांडले. पंढरीची वारी, जय मल्हार-म्हाळसा अशा पुराणातील व्यक्तिरेखाही रांगोळीतून साकारल्या आहेत. स्पर्धकांनी समाजातील ज्वलंत प्रश्न आपल्या कलेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडले असून हे प्रदर्शन पाहण्यासाठी जिल्हाभरातील कलारसिक गर्दी करत आहेत. या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत व्यक्तिचित्र गटात मुंबईच्या संदीप घुले व अक्षय पै यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला. तर इस्लामपूरचा सचिन अवसरे याने तृतीय, दापोलीच्या शकुनदेव महाकाल यांनी चतुर्थ तर संगमनेरच्या प्रमोद आर्वी याने पाचवा क्रमांक पटकावला. गालिचा प्रकारात कुणाल चौधरी प्रथम, पुणे, मारुती कोरे द्वितीय, रहिमतपूर, दीपक चव्हाण तृतीय, पुणे, शिवानी पवार आरफळ, चतुर्थ व पुणे येथील गणेश तुपे याने पाचवा क्रमांक मिळविला. विजेत्यांना ९५ हजार रुपयांची विविध ५५ बक्षिसे प्रदान करण्यात आली.परीक्षक म्हणून प्रा. सूर्यकांत होळकर, प्रा. प्रताप जगताप, विजय टिपुगडे, डॉ. तेजस लोखंडे, आर. बी. कदम, विजय दीक्षित, महामुनी यांनी काम पाहिले. ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश घाडगे, काकासाहेब निकम, भास्कर जाधव, सुखदेव माने, संतोष पवार, राजेश माने, शंकर भोसले, शिवाजी भोसले, प्रदीप माने, अ‍ॅड. विकास राक्षे, मारुती कोरे, निखिल काटे, अजिंक्य भोसले, रणजित माने, विक्रांत माने, अमर शेडगे, ओंकार जाधव, चेतन माने, प्रकाश माने, अमोल माने यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)