शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या टाकीत पडून बालकाचा मृत्यू

By admin | Updated: February 5, 2016 00:59 IST

साताऱ्यातील घटना : मृत बालक इमारत बांधकामावरील वॉचमनचा मुलगा

सातारा : कदमबाग परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीसाठी बांधलेल्या पाण्याच्या टाकीत पडून तीन वर्षांच्या बालकाचा गुरुवारी बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या इमारतीच्या बांधकामावर वॉचमन म्हणून काम करणाऱ्या दाम्पत्याचा तो मुलगा होता. प्रेम महेश माले असे मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील महेश माले (मूळ रा. त्रिचंद, ता. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) हे रोजगारासाठी सहकुटुंब साताऱ्यात राहतात. कदमबाग परिसरात पुष्पदीप अपार्टमेंट या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तेथे ते वॉचमन म्हणून काम करतात. गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे ते कामावर रुजू झाले. त्याच इमारतीतील गाळ्यात त्यांचे कुटुंब राहते. जवळच पाण्याची टाकी आहे. सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांची पत्नी टाकीजवळ कपडे धूत होती. जवळच प्रेम खेळत होता. कपडे वाळत टाकण्यासाठी त्याची आई टाकीपासून थोडी दूर गेली. ती परतल्यावर प्रेम जागेवर दिसला नाही. तेथे ठेवलेली बादली उपडी पडल्याचे दिसून आल्यानंतर तिने टाकीत पाहिले, तेव्हा प्रेम टाकीत पडल्याचे दिसून आले आणि तिने आक्रोश सुरू केला. आसपासच्या लोकांनी धाव घेऊन प्रेमला टाकीबाहेर काढले आणि तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी प्रेम मृत झाल्याचे सांगितले. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या महिला फौजदार तावरे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा प्रेमचा मृतदेह त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आला. दरम्यान, शाहूपुरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.