ढेबेवाडी येथे वत्सला चॅरिटेबल ट्रस्ट व गरुड नर्सिंग होम यांच्यातर्फे व जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश अण्णासाहेब पाटील यांच्या सौजन्याने बालआरोग्य मोफत तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. गरुड बोलत होते. यावेळी डॉ. शर्मिला गरुड, गौरी चव्हाण, सुशांत व्हावळ, प्रा. इला जोगी, नीरू गांधी, विराज जांभळे, विजय विभूते, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. कृष्णाजी गरुड म्हणाले, देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी बालकांचे आरोग्य जपणे गरजेचे आहे. या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांच्या सहकार्याने विभागातील कुपोषित बालकांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले. त्यामुळे बालकांना कुपोषित श्रेणीतून बाहेर पडण्यासाठी मदत होईल. देशाचे आधारस्तंभ मजबूत होतील. पालकांनीही मुलांच्या औषधोपचारांबरोबरच त्यांच्या आहाराकडे लक्ष द्यावे.
या शिबिरासाठी अंगणवाडी सुपरवायझर, सेविका यांच्याकडून कुपोषित बालकांची माहिती संकलित करून तपासणी व उपचार करण्यात आले. सुजाता कारंडे यांनी स्वागत केले. संजय काळे यांनी प्रास्ताविक केले. संजय पाटील यांनी आभार मानले.
फोटो : ०९केआरडी०५
कॅप्शन : ढेबेवाडी (ता. पाटण) येथे आयोजित बालआरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.