शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
3
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
4
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
5
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
6
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
7
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
8
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
9
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
10
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
11
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
12
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
13
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
14
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
15
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
16
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
17
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
18
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
19
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
20
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 

मुलं उतरणार ‘स्पर्धे’त!

By admin | Updated: May 27, 2016 00:02 IST

विद्यार्थ्यांचा कल : बारावीनंतर अनेकांनी निवडला स्पर्धा परीक्षांचा पर्याय--लोकमत सर्वेक्षण

सातारा : आयुष्याला खऱ्या अर्थानं कलाटणी देणारी अन् सर्वच विद्यार्थ्यांना ज्याची धास्ती असते ती बारावीची परीक्षा यशस्वी केल्यानंतर आता विद्यार्थी भविष्याची परीक्षा द्यायला सज्ज झाले आहेत. बारावीनंतर पुढे काय? या प्रश्नावर विद्यार्थ्यांना बोलतं केलं असता मेडिकल, इंजिनिअरींग, स्पर्धा परीक्षा व इतर अशा चार पर्यायांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा हा पर्याय निवडल्याचे समोर आले आहे.बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांचा कल नेमका कशात आहे, याबाबत ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेत असे दिसून आले की, आता अनेक शासकीय क्षेत्रात नोकरभरतीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्या माध्यमातून विविध पदे भरली जात आहेत. त्यामुळे नोकरीच्या जास्त संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. साहजिकच स्पर्धा परीक्षांकडे कल वाढला आहे. मेडिकल, इंजिनिअरींग, सी. ए. सी. एस., एम. बी. ए. या शाखेत प्रवेश घेणाऱ्यांचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे. स्पर्धा परीक्षाच का?नोकरीच्या संधी जास्त असल्याने बारावीनंतर गुणवत्ता यादीत येणारे विद्यार्थीदेखील आता स्पर्धा परीक्षेकडे वळू लागले आहेत. इतर शाखेत जाण्यापेक्षा आर्टस्, कॉमर्सची पदवी घेऊन स्पर्धा परीक्षा देण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढू लागला आहे.पदवी अन् स्पर्धा परीक्षांचा अभ्यास एकत्रकॉमर्स, आर्टस् शाखेत प्रवेश घेऊन पदवीपर्यंतचे शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही करता येऊ शकतो. बारावीनंतर पदवीसाठी तीन वर्षे लागतात. त्यामुळे या कालावधीत शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठीही वेळ मिळू शकतो. पदवी घेतल्यानंतर लगेच स्पर्धा परीक्षा देता येते. त्यामुळे नोकरी मिळविण्याच्या संधी जास्त असतात. म्हणून विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे वळू लागले आहेत.वेळ आणि खर्चही वाचतोबारावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मेडिकल, इंजिनिअरींग यासारख्या शाखेत प्रवेश घेतात. त्यांची स्वप्नं वेगळी असतात. मात्र, हे शिक्षण घेण्यासाठी खर्च जास्त असल्याने आता अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा पर्याय निवडत आहेत. त्यामानाने रेग्युलर शिक्षणाला फारसा खर्च येत नाही.स्पर्धेत मुलींचे प्रमाण जास्तस्पर्धा परीक्षा देणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण वाढू लागले आहे. विविध क्षेत्रात स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून श्रेणी १, २ ची पदे भरली जातात. गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहिल्यास यामध्ये मुलींचे प्रमाण जास्त असल्याचे दिसते. शालेय अभ्यासक्रमात गुंतून राहण्यापेक्षा तो वेळ स्पर्धा परीक्षेसाठी दिल्यास हमखास नोकरी मिळू शकते, हा विश्वास मुलींमध्ये पाहायला मिळतो.