वाई : ऐन थंडीत पालकांबरोबर ऊसतोडणीसाठी आलेल्या चिमुकल्यांना तीर्थक्षेत्र श्री कोटेश्वर पंचक्रोशी सेवा मंडळाच्यावतीने ड्रेसचे वाटप करण्यात आले. सुमारे ४२४ ड्रेसचे वितरण मंडळाच्यावतीने करण्यात आले.किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना लि., भुर्इंज, किसन वीरनगर येथे तीर्थक्षेत्र श्री कोटेश्वर पंचक्रोशी सेवा मंडळ, गोवे चे संस्थापक अध्यक्ष सदाशिवराव बागल यांचे संकल्पनेतून किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्यातील ऊस तोड कामगार व हमाल कामगार यांचे मुलांना वय वर्षे २ ते १२ पर्यंत प्रत्येकी २ ड्रेसचे किसन वीर कारखान्याचे कार्यकारी संचालक विजय वाबळे यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले.या कार्यक्रमासाठी अमोल जाधव, सतीश जाधव, देवेंद्र जाधव, दत्तात्रय जाधव, धनाजी जाधव, गुलाब कदम, नारायण बल्लळा, यमुना हेंद्रे इत्यादींनी सहकार्य केले.यावेळी विजय वाबळे म्हणाले की, तीर्थक्षेत्र श्री कोटेश्वर पंचक्रोशी सेवा मंडळाचा हा उपक्रम स्तुत्य व सातारा जिल्ह्यामध्ये एक नवीन क्रांतिकारक इतिहास नोंदविणारा आहे. (प्रतिनिधी)
ऊसतोड कामगारांच्या मुलांना मायेची उब
By admin | Updated: December 9, 2014 23:23 IST