महाबळेश्वर : येथील राम-विठ्ठल मंदिर येथे गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाचा शुभारंभ आज मॅरेथॉन स्पर्धेने करण्यात आला. नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल यांनी स्पर्धकांना हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. या स्पर्धेला संयोजकांप्रमाणेच शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.लहान व मोठा गटांत पार पडलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत मोठ्या गटात पहिला येण्याचा मान सुनील जाधव यांनी पटकाविला तर प्रदीप जाधव दुसरा तर बबलू वाडकर हा तिसरा क्रमांक मिळविला. या स्पर्धेत एकून ९५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. लहान गटात विनीत रांदड हा प्रथम आला. श्रेयस बावळेकर द्वितीय तर सुनील साळुंखे हा तृतीय आला. या गटात पर्यटकांच्या मुलांसह एकूण ८१ स्पर्धकांनी भाग घेतला होता. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत, शिवरतन पल्लोड, अतुल सलागरे, शिवसेना शहर प्रमुख विजय नायडू, रोटरी अध्यक्ष नितीन परदेशी, विशाल तोष्णीवाल, आनंद पल्लोड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सचिन धोत्रे यांनी सूत्रसंचालन केले. सचिन उगले यांनी आभार मानले.संयोजकांच्या वतीने जयंतीनिमित्त बुधवारी महिलांसाठी रांगोळी स्पर्धा होणार आहेत. रात्री साडेनऊ वाजता ‘हास्यदान’ हा एकपात्री प्रयोग सादर केला जाणार आहे. गुरुवारी शहरातून गणेश प्रतिमेची भव्य मिरवणूक व पालखी सोहळा पार पडणार आहे. शुक्रवारी मुख्य जयंतीदिनी सकाळी आठ वाजता अथर्वशीर्ष पठण, नऊ वाजता अभिषेक, दहा वाजता श्री गणेश आवर्तन, दुपारी १२ वा. श्रींचा पाळणा, १ ते ३ श्री गणेश याग, दुपारी १ ते ५ महाप्रसाद, ६ ते ९ भजन, रात्री ९. ३० वा मराठी हिंदी भावगीतांचा कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होईल. (प्रतिनिधी)
मॅरेथॉनमध्ये धावली पर्यटकांची मुलं
By admin | Updated: January 21, 2015 23:51 IST