शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ई निविदा प्रक्रियेवर मुख्याधिकारी ठाम

By admin | Updated: September 4, 2014 00:07 IST

सातारा पालिका : खाबुगिरीला आळा घालण्यासाठी कडक अंमलबजावणी

सातारा : पालिकेच्या माध्यमातून शहरात राबविण्यात येणारी विकासकामे ई निविदेद्वारेच करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या प्रक्रियेमुळे खाबुगिरीला आळा बसणार असल्याने या प्रक्रियेला विरोध झाला असला तरीही तो डावलून ई निविदांची प्रक्रिया सुरुच ठेवली आहे. सातारा पालिकेत सातारा विकास आघाडी व नगरविकास आघाडीची सत्ता आहे. मात्र, दोन्ही आघाड्यांत पाय ओढा-ओढीचे राजकारण वाढले आहे. एका आघाडीने मांडलेला मुद्दा किंवा विषय हाणून पाडण्यावर दुसऱ्या आघाडीतील काही नगरसेवकांचा भर असतो. त्यातच दोन्ही आघाड्यांमध्ये मलिद्यावर ताव मारणारे काही झारीतील शुक्राचार्यही कमी नाहीत. दोन्ही आघाड्यांना चुचकारुन आपल्या पदरात वजनी माप पाडून घेणारे पालिकेच्या बाहेरील ‘नारद’ही आहेत. या सर्वांच्या ‘हो ना’ वृत्तीशी सामना करत पालिका प्रशासनाला योजना राबवाव्या लागत आहेत. प्रशासन हे आपल्या हातातील ‘बाहुले’ आहे, असाही काहींचा गैरसमज आहे. त्यांना समज देण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळेच प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम आहे.ई टेंडरिंग प्रक्रियेमुळे पालिकेत असणारी अनेकांची दुकाने बंद होणार आहेत. कामे देताना अधिक पारदर्शकता येईल. तसेच या कामांच्या गुणवत्तेवरही प्रशासनाचा अंकुश राहिल. नागरिकांचा पैसा वाया जाणार नाही, अशा अनेक हितकारक गोष्टी घडणार आहेत. मात्र, आपली दुकाने बंद होण्याच्या भीतीने अनेक जण धास्तावल्याचे चित्र आहे. त्यामुळे ‘लांडगा आला रे आला’ असं म्हणून रात्री अपरात्री साखर झोपेतल्या लोकांना जागं करण्याचं काम काही ‘कोतवाल’ मिजाशीनं करत आहेत. सातारचं तिकडं काहीही होवो आपल्याला टक्का मिळाला म्हणजे झालं, एवढ्यावरच काहींची नजर आहे. रचनात्मक विकासाला त्यामुळेच त्यांचा विरोध आहे. पालिका प्रशासनाने अशा ‘कोतवालांची’ चाल ओळखून चांगले काम मागे घेता कामा नये, अशी नागरिकांची इच्छा आहे. पारदर्शक कारभार होणे, सर्वांसाठीच लाभदायक आहे. या पार्श्वभूमीवर आघाड्यांतील राजकारणाची तमा न बाळगता पालिका प्रशासनाने ई निविदा प्रक्रिया सुरुच ठेवली आहे. ५ लाखांच्या पुढील सर्वच कामे ई टेंडरिंग प्रक्रियेनेच करायची, असे धोरण आखले आहे. ई टेंडरिंग प्रक्रियेमध्ये काही बोगसगिरी झाली असेल तर त्याविरोधात तक्रार करण्याचे अधिकार सामान्य नागरिकालाही आहे. त्यामुळे लांडगा आला रे आला म्हणत चांगल्या गोष्टीला विरोध करण्याची वृत्ती हाणून पाडण्याचेच प्रयत्न व्हायला हवेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)कूपर कारखाना ते कमानी हौद, मोती चौक ते बुधवार नाका, बुधवार नाका ते कोमटी चौक, जिल्हा कारागृह ते मनाली हॉटेल, मोती तळे ते सुरुची बंगला मार्गे गेंडामाळ नाका, नागाचा पार ते भटजी महाराज मठ व मंगळवार पेठेतील नंदादीप अपार्टमेंट ते खारी विहीर या सात रस्त्यांसाठी ही निविदा प्रक्रिया राबविली आहे. ई टेंडरिंग प्रक्रिया ही चांगल्या कारभाराची नांदी आहे. शासनाच्या आदेशानुसारच आम्ही ही प्रक्रिया राबविली आहे. यामुळे स्पर्धा वाढेल आणि अधिक दर्जेदार कामे होतील. त्यामुळे ही प्रक्रिया राबविण्यावर आम्ही ठाम आहोत.- अभिजित बापट, मुख्याधिकारी