शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक द्रव्याचा टँकर खंबाटकी घाटात उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 23:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्कखंडाळा : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात रासायनिक द्रव्य घेऊन जाणारा टँकर पलटी झाला. घाटाच्या परिसरात उग्र वास सुटल्याने घाटातून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक बोगदा मार्गाने वळविण्यात आली.खंबाटकी घाट उतरताना एका वळणावर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रासायनिक द्रव्य घेऊन जाणारा टँकर (टीएन ३० बीएच ६९७९) पलटी झाला. टँकर पलटी ...

लोकमत न्यूज नेटवर्कखंडाळा : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात रासायनिक द्रव्य घेऊन जाणारा टँकर पलटी झाला. घाटाच्या परिसरात उग्र वास सुटल्याने घाटातून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक बोगदा मार्गाने वळविण्यात आली.खंबाटकी घाट उतरताना एका वळणावर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रासायनिक द्रव्य घेऊन जाणारा टँकर (टीएन ३० बीएच ६९७९) पलटी झाला. टँकर पलटी झाल्याने त्यामध्ये असलेले नायट्रिक आम्ल बाहेर पडू लागल्याने परिसरात सर्वत्र उग्र वास पसरला.या घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. टँकरचा स्फोट होण्याच्या भीतीमुळे घाटमार्गाची वाहतूक बोगदा मार्गाने वळविण्यात आली. उग्र वासाच्या व शरीरास अपायकारक द्र्रव्यामुळे टँकरजवळ जाण्यास भीती वाटत असल्याने पोलिसांनी वाई पालिका व भुर्इंज येथील किसन वीर साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला बोलाविले.अग्निशमनच्या दोन्ही गाड्या घटनास्थळी आल्यानंतर आम्लाची दाहकता कमी करण्याचा प्रयत्न जवानांनी सुरू केला. पाण्याचे फवारे टँकरवर मारले जात होते. या अपघातानंतर टँकर चालकाने गाडीतून उडी टाकून पलायन केले. त्यामुळे टँकर कोठून कोठे चालला होता? याबाबत अद्याप पोलिसांना माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे पोलिसांना संबंधित टँकर मालकाशी संपर्क साधता आला नाही.खंबाटकी घाटातून साताºयाकडे येणारी वाहतूक अडविण्यात आली असून, ही वाहतूक बोगदामार्गे दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती. बोगद्यामधून दुहेरी वाहतूक सुरू असल्याने वाहन चालकांना पोलिसांकडून काळजी घ्यावी, अशा सूचना केल्या जात होत्या.घाटात अ‍ॅसिड वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याचे समजताच प्रथम घाटातील वाहतूक बंद करण्यात आली. स्फोटक आम्ल नसले तरी शरीरास अपायकारक असल्याने योग्य खबरदारी पोलिसांनी घेतली.