शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

केमिकलचा टँकर महामार्गावर उलटला

By admin | Updated: June 14, 2015 23:56 IST

कऱ्हाडनजीक अपघात : रस्त्यावरील वाहतूक खोळंबली

कऱ्हाड/मलकापूर : इचलकरंजीहून चिपळूणला केमिकल घेऊन निघालेला टँकर कऱ्हाडनजीकच्या कोल्हापूर नाक्यावर पलटी झाला. रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. दरम्यान, अपघातानंतर महामार्गावर केमिकल पसरल्याने वाहतूक दुपारपर्यंत उपमार्गावरून वळविण्यात आली होती. अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, इचलकरंजी येथे पार्वती इंडस्ट्रीज इस्टेट नावाची केमिकल कंपनी आहे. ही कंपनी चिपळूण येथील साबण बनविणाऱ्या कंपनीला सोडीयम सेलिकेट नावाचे केमिकल पुरविण्याचे काम करते. या कंपनीतील टँकरचालक धनाजी यादव (वय २६) हा रविवारी पहाटे केमिकलचा टँकर (एमएच ०९ बीसी १३६५) घेऊन इचलकरंजीहून चिपळूणला जाण्यासाठी निघाला. केमिकलचा टँकर कऱ्हाडनजीक कोल्हापूर नाका येथे पोहोचला असताना चालकाचा ताबा सुटून टँकर उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकला. टँकर महामार्गावरच पलटी झाला. परिसरातील नागरिक व प्रवाशांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमी चालकाला टँकरमधून बाहेर काढले. दरम्यान, अपघातानंतर काही वेळातच टँकरच्या टाकीमधून केमिकलला गळती लागली. हे केमिकल संपूर्ण महामार्गावर पसरण्यास सुरुवात झाली. रस्त्यावर केमिकल पसरल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. केमिकल पसरत चालल्यामुळे भीतीचे वातावरण निमार्ण झाले होते. या अपघाताची माहिती मिळताच कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह महामार्ग पोलीस व महामार्ग देखभालचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून वाहतूक उपमार्गावर वळविली. तसेच पालिकेच्या अग्निशामक पथकालाही अपघातस्थळी पाचारण केले. अग्निशामकच्या पथकाने रस्त्यावर साचलेले केमिकल पाण्याच्या साह्याने धुऊन काढले. सकाळी अपघातग्रस्त टँकर महामार्गावरून हटविण्यात आला. तसेच दुपारी वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. अपघातात टँकरसह कठड्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. अपघाताची नोंद कऱ्हाड शहर पोलिसांत झाली आहे. (प्रतिनिधी)