शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कवठेच्या बगाड यात्रेत ‘चांगभलं’चा जयघोष

By admin | Updated: April 16, 2017 22:45 IST

राज्यभरातील भाविकांची हजेरी : रथ ओढण्यासाठी बारा बैलांचे बळ; धार्मिक कार्यक्रम उत्साहात

कवठे : कवठे, ता. वाई येथील यंदाची बगाड यात्रा पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. ‘काशिनाथाचं चांगभलं, भैरवनाथाचं चांगभलं’च्या जयघोष, गुलालाची उधळण अन् हजारो भाविकांच्या उपस्थितीत बगाड रथ ओढण्यात आला.यात्रेच्या आदल्या रात्री १२ वाजता भैरवनाथ मंदिरात कौल लावण्यात आला. सात ग्रामस्थांनी यंदा बगाड्या होण्यासाठी कौल आजमावला. यापैकी रामदास विनायक डेरे यांना कौल मिळाल्याने यंदाचा बगाड्या होण्याचा मान डेरे यांना मिळाला. सोनेश्वर ओझर्डे येथे कृष्णा नदीमध्ये विधिवत स्नान करून बगाड्याला पहाटे मुकाई मंदिर विठ्ठलवाडी येथे पोहोचविण्यात आले. ग्रामस्थांनी भैरवनाथ मंदिरासमोरील पटांगणात रात्रभर बगाड गाडा तयार करण्याचे काम पूर्ण करून पहाटे गाडा विठ्ठलवाडी येथे ससाणे भावकीच्या बैलामार्फत पोहोचविण्यात आला. कवठे गावामध्ये एकूण अकरा भावक्या असून, या अकरा भावकींच्या बैलांना ठराविक अंतर बगाड ओढण्याची मुभा दिली जाते. यास ‘खुता’ असे म्हणतात. प्रत्येक खुत्यात सहा बैलजोड्या म्हणजेच बारा बैलांनी गाडा ओढला जातो. दुपारी दीड वाजता बगाड रथ कवठे गावाकडे आणण्यास सुरुवात झाली. ‘काशिनाथाचं चांगभलं, भैरवनाथाचं चांगभलं’ या गजरात शिवारातून बगाड कवठे गावाकडे मार्गस्थ करण्यात आला.ठराविक अंतरानंतर बगाडाच्या शिडाच्या पाच प्रदक्षिणा पूर्ण करण्यात येत होत्या. यामुळे अरिष्ट टळते असे मानले जाते. सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान बगाड यात्रा कवठे गावात येऊन निर्विघ्न पार पडली. खांद्यावरून बगाड्यास भैरवनाथ मंदिरात नेऊन त्याच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. बगाड यात्रेनंतर रात्री छबिन्याच्या कार्यक्रम पार पडला. (वार्ताहर)आज प्रेक्षणीय कुस्त्यांचा रंगणार थरारयात्रेच्या दुसऱ्या दिवशी दि. १७ रोजी मनोरंजनासाठी काळूबाळू लोकनाट्य तमाशा मंडळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, संध्याकाळी नामवंत मल्लांच्या कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. चांदीची गदा, मानाच्या ढाली तसेच विविध चार लाखांपर्यंत इनामाच्या कुस्त्यांच्या फडाचे आयोजन यात्रा कमिटीमार्फत करण्यात आले आहे. महिलांसाठी दि. २९ रोजी सुरेखा पुणेकर यांच्या लावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.