शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

चव्हाण अन् पवारांवर दिल्लीचा अन्याय!

By admin | Updated: November 25, 2015 23:49 IST

रामराजेंची खंत : यशवंतरावांनंतर शरदरावांचाही झाला नाही बहुमान; अमृतमहोत्सवी पुरस्कारांचे वितरण

सातारा : ‘दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या इतकीच गुणवत्ता आणि संपूर्ण देशाच्या व्यवस्थेची जाण असणाऱ्या शरद पवारांना पंतप्रधानपद मिळायला हवे होते; परंतु दिल्लीतल्या राजकीय खेळापायी अजून ते घडले नाही,’ अशी खंत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केली. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यातील कृषी, सहकार, महिला सबलीकरण, औद्योगिक, साहित्यिक व क्रीडा क्षेत्रांत उत्कृष्ठ कार्याबद्दल संस्था व व्यक्तींना ‘शरद अमृतवर्ष’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. माजी खासदार लक्ष्मणराव पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष सुनील माने, आ. शशिकांत शिंदे, आ. प्रभाकर घार्गे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप धरू तसेच संचालकांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. बी. डी. पवार म्हणाले, ‘शरद पवार यांनी आपल्या अभ्यासपूर्ण नेतृत्वातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. आयात नाही तर निर्यात करणारा देश म्हणून भारताची ओळख जगभर निर्माण करण्यात पवारांचा प्रमुख वाटा आहे. त्यांच्याच आयात-निर्यात धोरणामुळे आजच्या घडीला कृषी क्षेत्रातून तब्बल २३२ अब्ज रुपयांची निर्यात भारत करतो आहे. दलाली व्यवस्थेला फाटा देऊन शेतकऱ्यांचा मालाला चांगला भाव मिळण्यासाठी व्यावसायिक धोरण राबविण्यात त्यांनी पुढाकार घेतल्याने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने व्यावसायिक प्रगती करता आली आहे. १९८९ मध्ये ते मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतीमालाच्या निर्यातीचा पाया घातला. आंबा, द्राक्षे ही फळपिके त्यांनी निर्यात केली. सामुदायिक मार्केटिंग व्यवस्था, बचतगटांना प्राधान्य, हॉर्टीकल्चर मिशन, शेतीत तंत्रज्ञानाचा वापर अशी धोरण त्यांनी राबविली. देशाच्या शेती व्यवसायाला पवारांनीच ऐतिहासिक दिशा दिली आहे.’अनंत दीक्षित म्हणाले, ‘यशवंतरावांनंतर महाराष्ट्र ज्याला समजला तो शरद पवार यांनाच. दुर्दैवाने या दोघांइतकी जाण असलेला नेता महाराष्ट्रात नाही. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार समाजात रुजवून महाराष्ट्राचं पाऊल पुढे नेण्यात यशवंतरावांइतकंच शरदरावांनाही यश आलेय. कितीही पुढे गेलं तरी गावाची वेस विसरायची नाही, हे दोघांनीही जाणलं होतं. कर्नल संतोष घोरपडे यांच्या बलिदानानंतर पोगरवाडीत त्यांच्या कुटुंबीयांना भेटून व त्यांचे सांत्वन करून पवारांनी ते दाखवून दिले आहे. यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्यातलं सगळ्यात मोठं साम्य म्हणजे समकालीन राहणं, हे होय. शिक्षण शक्तीचं सामर्थ्य दोघांच्याही कुटुंबीयांनी जाणले होते. त्यामुळे दोघेही अखिल भारतीय पातळीवर पोहोचू शकले आहेत. ’ (प्रतिनिधी)शरदरावांना चंद्र, सूर्याची उपमा‘जिथे समर्पण वृत्ती असते, तिथे जीर्णता कधीच दिसून येत नाही. चंद्र कधीही जुना होत नाही, सूर्य कधीही म्हातारा होत नाही, समुद्र कधीही आकसत नाही,’ अशा भाषेत दीक्षित यांनी शरद पवारांच्या कर्तबगारीला उपमा दिली. यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.’