शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

महामोर्चासाठी चूल अन् गाव बंद

By admin | Updated: September 30, 2016 01:27 IST

नियोजन बैठक : चिंचणेर वंदनमध्ये एकवटली स्त्री शक्ती

सातारा : साताऱ्यात दि. ३ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या मराठा महामोर्चासाठी चिंचणेर वंदन, ता. सातारा येथे आयोजित बैठकीत पंचक्रोशीतील महिला एकत्र आल्या होत्या. या बैठकीत त्यांनी ‘चूल बंद, गाव बंद’ असा निर्णय घेऊन महामोर्चात सामील होण्याचा निर्णय घेतला. चिंचणेर वंदन येथील श्रीराम मंदिरमध्ये महामोर्चा नियोजन बैठक झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बैठकीला सुरुवात झाली. यावेळी महाविद्यालयीन युवती आणि महिलांनी कोपर्डी घटनेतील नराधमांना लवकरात लवकर फाशी द्यावी, अशी जोरदार मागणी केली. तसेच मराठा समाजाला आरक्षण आणि अ‍ॅट्रॉसिटी कायदा यावर आपली मते व्यक्त केली. बहुतांश मराठा समाज हा शेती करीत आहे. या समाजातील शेतकरी अल्पभूधारक आहे. आज अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच अन्य विभागांत प्रवेश घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात फी भरावी लागत आहे. मात्र, पालकांना ती भरणे अशक्य असते. त्यामुळे गुणवत्ता असूनही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते, अशा भावनाही या बैठकीत व्यक्त करण्यात आल्या. मराठा समाजाच्या न्याय व हक्कासाठी समाज बांधवांच्या बरोबर महामोर्चात सहभागी होणार आहे. ‘चूल बंद, गाव बंद’ करून सहकुटुंब सामील होऊन महामोर्चा यशस्वी करणार आहे, असे यावेळी महिलांनी सांगितले. शेवटी महिलांनी बहुसंख्येने महामोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या बैैठकीत काश्मीरमधील उरी येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. (प्रतिनिधी) मराठा समाजाची विराट ताकद दाखविण्याचा निर्णयसातारा : सातारा येथील मराठा क्रांती महामोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक मराठा समाजबांधव पुढे आला आहे. विशेष म्हणजे मराठा बांधवांबरोबरच समाजातील अन्य घटकही त्यामध्ये सहभागी होणार असून, त्यांनी त्याबाबतची घोषणाही शुक्रवारी केली आहे. सातारा तालुक्यातील अनेक गावांनी तर चूल बंद ठेवण्याचा निर्धार केला आहे. मराठा क्रांती महामोर्चात आबालवृद्ध सहभागी होणार असल्याचा निर्धार करण्यात आला असून, सातारा तालुका आणि सातारा शहराच्या नियोजन बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली.दरम्यान, सातारा शहरात प्रमुख महामोर्चा असल्यामुळे सातारकर थोरल्या भावाची भूमिका बजावणार आहेत. साताऱ्यात येणाऱ्या वाहनांसाठी जवळपास ४० ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून, कोणत्याही परिस्थितीत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत साताऱ्यात सर्वाधिक लोक सहभागी कसे होतील, यावर भर देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.सातारा येथे दि. ३ आॅक्टोबर रोजी मराठा क्रांती महामोर्चा होणार आहे. त्याची जय्यत तयारी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सातारा येथील स्वराज मंगल कार्यालयात नियोजन बैठक झाली. या बैठकीत विविध मान्यवरांनी आपली मते मांडत काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या. सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांच्या नियोजन बैठक झाल्या आहेत. मात्र, सातारा तालुक्यातील बैठक सर्वात शेवटी घेण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार ही बैठक झाली. दोन हजार रणरागिणींची आज नऊवारी साडीत दुचाकी रॅली