शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

कऱ्हाडमधील टोळीवर ‘मोक्का’अंतर्गत आरोपपत्र

By admin | Updated: December 10, 2014 23:47 IST

मयूर गोरे खूनप्रकरण : गुंड दीपक पाटीलसह सहाजणांचा समावेश

कऱ्हाड : मयूर गोरे खूनप्रकरणी ‘मोक्का’ कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलेल्या गुंड दीपक पाटील टोळी विरुद्ध पुण्याच्या विशेष न्यायलयाच्या न्या. प्राची कुलकर्णी यांच्यासमोर काल, मंगळवारी दोषारोपपत्र सादर करण्यात आले. सहाजणांचा या टोळीत समावेश असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे यांनी दिली. वैभव रमेश माने (वय २५, रा. कार्वेनाका, कऱ्हाड), दीपक भीमराव पाटील (३०, रा. आरळे, ता. पन्हाळा, सध्या रा. नांदलापूर, कऱ्हाड), श्रीयाल ऊर्फ गोट्या भीमराव धेंडे (२३, रा. वालनेसवडी, ता. मिरज), अनिल तानाजी माळी (२०, रा. कालेटेक, ता. कऱ्हाड), सागर खुबू पवार (२३, रा. लमाणतांडा, इस्लामपूर) व अभिजित दत्तात्रय विभूते (३४, रा. कालेटेक) अशी ‘मोक्का’ लावलेल्या आरोपींची नावे आहेत. जखीणवाडी येथे ९ जून २०१४ रोजी मयूर मोहन गोरे या युवकाचा गोळ्या घालून निर्घृण खून करण्यात आला होता. नातेवाईक महिलेशी असलेल्या मैत्रीमुळे आपली बदनामी होईल, या भीतीपोटी वैभव माने याने सुपारी देऊन हा खून केला असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यानुसार १३ जून रोजी वैभव मानेला अटक करण्यात आली. त्यानंतर कुख्यात गुंड दीपक पाटील याच्यासह आणखी चारजणांना अटक झाली. दीपक पाटीलच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यामार्फत कऱ्हाड पोलिसांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे (पान १ वरून) प्रस्ताव सादर केला. पोलीस महानिरीक्षकांनी या प्रस्तावाला मान्यता देऊन ११ सप्टेबर रोजी या टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई केली. त्याचा तपास पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे यांच्याकडे देण्यात आला. घट्टे यांच्यासह रमेश गर्जे, एस. ए. खान, सरदार नायकवडी, शशिकांत काळे या पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास केला. तपासादरम्यान सर्व आरोपींची पार्श्वभूमी, त्यांच्यावर दाखल असणारे पूर्वीचे गुन्हे तसेच शंभरहून अधिक साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले. अपर पोलीस महासंचालक के. एल. बिष्णोई यांनी तपासाची छाननी करून ८ डिसेंबर रोजी या गुन्ह्णात ‘मोक्का’ कायद्यांतर्गत दोषारोपपत्र सादर करण्यास तपास पथकाला परवानगी दिली. त्यानुसार उपअधीक्षक घट्टे यांच्यासह पथकाने मंगळवारी, दि. ९ पुणे-शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयाच्या न्य. प्राची कुलकर्णी यांच्या न्यायालयात या टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत दोषारोपपत्र सादर केले.‘मोक्का’अंतर्गत दुसरी कारवाईसातारच्या पोलीस अधीक्षकपदी डॉ. अभिनव देशमुख रुजू झाल्यापासून जिल्ह्यातील ‘मोक्का’ची ही दुसरी कारवाई आहे. यापूर्वी दहिवडी येथील एका टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असल्याचेही उपअधीक्षक घट्टे यांनी स्पष्ट केले.