शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जुगारप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:03 IST

फलटण : झिरपवाडी येथे फलटण शहर पोलिसांनी छापा टाकून तीन पानी पत्त्यावर जुगार खेळत असलेल्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल ...

फलटण : झिरपवाडी येथे फलटण शहर पोलिसांनी छापा टाकून तीन पानी पत्त्यावर जुगार खेळत असलेल्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यातील तिघा जणांना अटक केली आहे. या ठिकाणाहून २ लाख १८ हजार ७५० रुपये किमतीचे रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, झिरपवडी हद्दीत सोमवारी (दि. ३) सायंकाळी सहाच्या सुमारास पेट्रोलपंपाच्या पाठीमागील मोकळ्या पत्र्याच्या शेडमध्ये चंद्रकांत भीमराव जाडकर (रा. निरगुडी, ता. फलटण), निलेश लक्ष्मण कदम (रा. गिरवी), नितीन मोहन गायकवाड (रा. तरडगाव), माउली भिवरकर (रा. धुळदेव), विशाल पवार (रा. सोमवार पेठ चौक, फलटण), सचिन गुंजवटे (रा. झिरपवाडी), कुणाल लालासाहेब भंडलकर (रा. उमाजी नाईक चौक, फलटण) यांनी तोंडाला मास्क न लावता एकत्र बसून जुगार खेळत असताना आढळून आले. त्यांच्याकडून २ लाख १८ हजार ७५० रुपये किमतीची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

सर्व संशयित आरोपींनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याच्या दृष्टीने व इतरांच्या जीवितास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याचा तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला. याप्रकरणी चंद्रकांत जाडकर, निलेश कदम, नितीन गायकवाड या तिघांना अटक करण्यात आलेली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, शरद तांबे, सतीश दडस यांनी केली. पोलीस कॉन्स्टेबल सतीश दडस यांंनी फिर्याद दिली. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दिलीप येळे करीत आहेत.