शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
4
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
5
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
6
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
7
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
8
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
9
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
10
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
11
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
12
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
13
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
14
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
15
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
16
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
17
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
18
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
19
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
20
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?

पत्ते बदलले तरी डाव मात्र राजेंच्याच हाती!

By admin | Updated: August 7, 2015 22:14 IST

आधे इथर, आधे उधर : सातारा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीतील लढायांनंतरचे चित्र संमिश्र--ग्रामपंचायत विश्लेषण

सागर गुजर- सातारा -पत्त्यांच्या खेळात हुकमाची पाने ज्याच्याकडे जास्त तो विजयी होतो. हुकमाची पाने असणारा सवंगडी समोर असला म्हणजे जीत आपलीच, हे जो जाणतो, तो खरा माहीर खेळाडू ठरतो. सातारा तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही असे खेळाडू लढले. पत्ते बदलले तरी डाव मात्र राजेंनीच जिंकला.जिल्ह्यात कुठेही कुणाची सत्ता असेना; पण सातारा शहरासह तालुक्यात दोन राजेंशिवाय पर्याय नाही, हे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर पुन्हा सिद्ध झाले. अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाल्याने त्या-त्या ठिकाणचे पत्ते बदलले गेले. जिंकून आलेले नवे भिडू काहीजण ‘जलमंदिर पॅलेस’वर तर काही ‘सुरुची पॅलेस’वर जाऊन भेटून आले. त्यामुळे कुणाचेही पॅनेल निवडून आले तरी सातारा तालुक्यात राजेंचा प्रभाव मात्र कायम आहे. तालुक्यातील ४१ पैकी १३ ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात यश आले. २८ गावांत सत्ताधारी व विरोधकांच्यात जोरदार रस्सीखेच झाली. शेंद्रे, परळी, डोळेगाव, संभाजीनगर, बोरगाव या प्रमुख ग्रामपंचायतींसह इतर काही ग्रामपंचायतींमध्ये सत्ता परिवर्तन झाले. सत्ता बदल झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या कार्यकर्त्यांमध्येच लढाया झाल्या. डोळेगावात खासदार समर्थकांची २५ वर्षे सत्ता होती. मात्र, ती उलथवून टाकत आमदार गटाने परिवर्तन घडविले. परळीतही आमदार गटाने मुसंडी मारली. शेंद्रेमध्ये आमदार गटाचे ज्ञानेश्वर गायकवाड व सहकाऱ्यांंच्या अजिंक्य पॅनेलने परिवर्तन घडविले. सासपडेत आमदार गटाचे मधुकर यादव यांनी ११ पैकी ८ जागा जिंकून सत्ता कायम राखली. बोरगावातही आमदार गटाने सत्ता काबीज केली आहे. नागेवाडी, गजवडी, गवडीतही आमदार गटाचेच वर्चस्व आहे.महादरेची सत्ता कायम राखण्यात खासदार उदयनराजे गटाला यश आले. कारंडवाडीत खासदार गटाने आमदार गटाचा ६-५ असा पराभव केला. या परिस्थितीत कुठल्या राजेंकडे किती ग्रामपंचायती, याची चर्चा सुरू आहे.कारभाऱ्यांचा प्रभाव ओसरला!संभाजीनगर ग्रामपंचायतीत उदयनराजे गटाचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रवी साळुंखे व आनंदराव कणसे यांनी सत्ता कायम ठेवण्यासाठी मोठी धडपड केली; पण संभाजीनगरातील जनतेने त्यांची सत्ता उलथून टाकली. १७ जागांपैकी त्यांना अवघ्या सहा जागा मिळविता आल्या. या ग्रामपंचायतीत सत्तांतर होऊन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मानणाऱ्या गटाची सत्ता आली आहे.मनोज घोरपडेंचा फत्त्यापुरात करिष्माकऱ्हाड उत्तर विधानसभा लढलेले स्वाभिमानी पक्षाचे मनोज घोरपडे यांचा फत्त्यापूरमध्ये करिष्मा कायम आहे. घोरपडे यांच्या गटाने ५ विरुद्ध ४ अशा फरकाने फत्त्यापूर ग्रामपंचायत ताब्यात घेतल्याने हा करिष्मा सिद्ध झाला.विलासपुरात मनोमिलनाला तीन अपक्षांचा चेकविलासपूर ग्रामपंचायत खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या दोन गटांनी मनोमिलनाच्या माध्यमातून लढविली. शिवेंद्रसिंहराजे समर्थक फिरोज पठाण यांनी जोरदार प्रयत्न करून १३ पैकी ९ जागा मिळविल्या; पण तीन अपक्षांनी ग्रामपंचायतीत शिरकाव करून मनोमिलनाच्या सत्तेला ‘चेक’ दिला आहे.खेडमध्ये सत्ता उलथण्याचे मनसुबे धुळीलाखेड ग्रामपंचायती आमदार शशिकांत शिंदे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची सत्ता उलथून टाकण्यासाठी विरोधकांनी मोट बांधली होती; पण विरोधकांचे मनसुबे धुळीला मिळाले. अनिल पवार यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी ग्रामविकास आघाडीने १७ पैकी १३ जागा पटकावल्या. हरिभाऊ लोखंडे, मिलिंद पाटील यांच्या गटाला अवघ्या तीन जागा मिळाल्या. तर संदीप मोझर यांच्या गटाला दोन जागा मिळाल्या आहेत.