आॅनलाईन लोकमतऔंध (जि. सातारा), दि. २२ : भोसरे, ता. खटाव येथे चंदनाच्या झाडाची चोरी करीत असताना एकास रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत औंध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.पोलिस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी, बुधवारी दुपारी भोसरे येथील नवनाथ काळे यांच्या शेतातील चंदनाचे झाड कुऱ्हाडीने तोडून चोरत असताना लत्या इसम काळे (रा. कोकराळे, ता. खटाव) हा आढळून आला. त्यावेळी त्याला ग्रामस्थांनी पकडले. त्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली.याबाबतची फिर्याद नवनाथ काळे यांनी औंध पोलिसांत दिली आहे. या घटनेची नोंद झाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुधीर येवले हे अधिक तपास करीत आहेत.
चंदन चोरट्याला पोलिसांकडून अटक
By admin | Updated: June 22, 2017 13:26 IST