शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चमको नगरसेवकांच्या विळख्यात सातारा!

By admin | Updated: October 30, 2014 00:38 IST

बसथांब्यांवर फुकटची जाहिरात : पैसा जनतेचा; रुबाब मात्र ‘मेहरबान’चा

सातारा : जनतेच्या पैशांतून बांधलेल्या बसथांब्यांवर दिमाखात स्वत:चा फोटो चमकविण्याचा प्रघात काही आजी-माजी चमको नगरसेवकांनी पाडलाय. काही जण माजी झाले तरी ‘मा. नगरसेवक’ असा उल्लेख करून या बसथांब्यांवर फुक्कटची जाहिरातबाजी करण्यात फुशारकी मारत आहेत.जनतेच्या पैशांतून अथवा खासगी विकसकाच्या माध्यमातून बसथांब्यांचे सुशोभीकरण करायचे आणि बसथांबा तयार होताच ‘अमुक-तमुक नगरसेवकाच्या निधीतून’ असा उल्लेख त्यावर करायचा, असा प्रकार सर्रास सुरू आहे. शहरात कुठेही जाहिरात फलक लावायचा झाल्यास पालिकेकडे कर जमा करावा लागतो. मात्र, बसस्थानकांवरील अशा जाहिरातींना कुठलाही कर नसल्याने जाहिरातबाजी केली जाते. ती वर्षानुवर्षे तशीच राहते. कलर गेला अथवा फ्लेक्स ऊन-वाऱ्याने फाटला तर मेहरबान मंडळी त्याची डागडुजी करतात; पण आपली ‘तारीफ’ कमी होऊ देत नाहीत. सातारचे नाक असणाऱ्या पोवई नाका परिसरातील रयत शिक्षण संस्थेजवळ एका माजी पदाधिकाऱ्याने अनेक वर्षांपासून बसथांब्यावरील जाहिरातीची जागा अडवून ठेवली होती. शहरात सुमारे सहा बसथांबे आहेत. यापैकी राजपथावरील बसथांब्याचे कूपर उद्योग समूहातर्फे सुशोभीकरण करण्यात आले होते. मात्र, कूपर कंपनीने आपली जाहिरात करणे टाळले. मात्र, जनतेच्या पैशांवर बसथांबे बांधून, त्यावर जाहिराती करण्याचा प्रकार काही केल्या थांबत नाही. हे बसथांब्यांवर खासगी उद्योगांच्या जाहिराती केल्यास पालिकेला जाहिरात कराच्या रूपाने उत्पन्न मिळू शकते. (प्रतिनिधी)