शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोरी अन् उमेदवार मिळविण्याचे आव्हान

By admin | Updated: July 17, 2016 01:04 IST

- पाटण नगरपंचायत - शह काटशह

अरुण पवार ---पाटण -पाटण शहरावर पकड असलेल्या पाटणकर गटात आता यापुढे डोकेदुखी वाढणार आहे. १७ प्रभागांमध्ये उमेदवारी देताना आणि नाराजांना खाली बसवताना नाकीनऊ येणार आहे. दुसरीकडे प्रमुख विरोधक आमदार देसार्इंचे पॅनेल निवडणुकीत उतरणार असेल तर त्यांना प्रथमत: १७ प्रभागांत उमेदवार मिळविण्याचे आव्हान पार पाडावे लागणार आहे.नगरपंचायत दर्जामुळे मान प्रतिष्ठा आहे. त्यामळे या निवडणुकीत लक्ष घालून किमान काही नगरसेवक हाताला लागले तरी बरेच काही मिळविले अशा मानसिकतेत देसाई गट, भाजपा, मनसे व इतर स्वतंत्र गट आहे. दुसरीकडे आतापर्यंत तरी पाटण शहरावर एक हाती सत्ता असलेले माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर गटाला पूर्वीच्या ग्रामपंचायतीसारखे वर्चस्व कसे राखता येईल यासाठी जास्तीत जास्त प्रभाग कसे बिनविरोध होतील, याचेही प्रयत्न करावे लागतील. मात्र, पाटण शहरात अलीकडेच सक्रिय झालेला वेगळा गट मोठा अडथळा ठरणार आहे. पाटण नगरपंचायत निवडणूक प्रक्रियेमध्ये सत्यजित पाटणकर यांचे कौशल्य कामी येणार आहे. कारण मागील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात त्यांची मोठी महत्त्वाची भूमिका होती. पिण्याचे पाणी, कचरा, आदी विकासकामे झाली नसल्यामुळे पाटणमध्ये राहणाऱ्या नागरिकांची मोठी नाराजी आहे. दुसरीकडे विद्यमान आमदार शंभूराज देसाई यांना स्वत:चे पाठबळ पाटण शहरात वाढवायचे आहे. त्यासाठी शहरातून देसार्इंच्या मागे उघडपणे सक्रिय राहणारा गट त्यांना अपेक्षित आहे. त्यामुळे आलेली नगरपंचायत आमदार देसार्इंना पूर्ण शक्तीनिशी लढवली तर ते त्यांना भविष्यात फायद्याचे ठरणार आहे. शेवटी निवडणुकीत पाटणकरांचे पारडे जड राहणार हे निश्चित आहे. प्रभागातील उमेदवारांना मतदान..पूर्वी वॉर्डात निवडणूक लढविणाऱ्या तिघांना अथवा दोघांना मतदान करावे लागत होते. आता मात्र, नगरपंचायत निवडणुकीत प्रभागातील एका उमेदवारासच मतदान करावे लागणार आहे. ज्या प्रभागावार ज्या समाजाची, व्यक्तीची किंवा मंडळे, संस्था यापैकी कोणाचीही पकड असेल त्यांचाच विजय होणार आहे. तिथे नेते, पक्ष या बाबी दुय्यम ठरणार असल्याचा कयास विश्लेषकांचा आहे.